Viral Video: नवरा-बायकोचं भांडण मिटवायला आले अन् २ कुटुंब तक्रार निवारण केद्रांतच भिडले; तुंबळ हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

Chhatrapati Sambhajinagar News: लग्न म्हटंल की, नवरा आणि बायकोमध्ये वाद-विवाद होणं स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर आजवर अनेक कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत,
Chhatrapati Sambhajinagar News
Viral VideoCanva

रामू ढाकणे, साम टीव्ही प्रतिनिधी

लग्न म्हटंल की, नवरा आणि बायकोमध्ये वाद-विवाद होणं स्वाभाविक आहे. सोशल मीडियावर आजवर अनेक कौटुंबिक वादाचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत,त्यात नवरा-बायकोसोबत कधी-कधी त्यांच्या संपूर्ण कुटुंबाची फ्रीस्टाईल हाणामारी झालेली आहे,त्यात पुन्हा एकदा अशीच एक घटना घडली आहे,ज्यात छत्रपती संभाजी नगरच्या महिला तक्रार निवारण केंद्रात पती आणि पत्नीमध्ये तुफान राडा असून बराच काळ यांची फिल्मी स्टाईल हाणामारी देखील झाल्याचं पहायला मिळालं. सध्या या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Viral Video: भयानक! भररस्त्यात धावत्या दुचाकीने अचानक घेतला पेट; पुढे जे घडलं ते... थरारक VIDEO समोर

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगरमधील महिला तक्रार निवारण केद्रांत सर्व हाणामारीची घटना घडली आहे. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांकडून मुलाच्या कुटुंबियांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या माहरहाणीत मुलीच्या कुटुंबियांनी मुलांच्या कुटुंबावर मिरची पूड टाकली असून धारदार विळ्याने वार केल्याचे समोर आले.मात्र तिथे असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद(argument) मिटवला.

मारहाण करणारी ही महिला पोलीस दलात कार्यरत असून तिचा पती हा सेवानवृत्त भारतीय जवान आहे. या दोन्ही कुटुंबात एकमेकांवरच्या संशयातून काही दिवसांपूर्वी वाद झाल्याची घटना घडली होती आणि आज महिला तक्रार निवारण केंद्रात त्यांची तारीख होती. आणि तिथेच हा सगळा राडा झालाय.

विशेष म्हणजे महिला तक्रार निवारण केंद्रातच हा संपूर्ण प्रकार घडल्याने नागरिकांनी तक्रारीचे निवारण कोणाकडे करायचे हा प्रश्न आता उपस्थित होतोय. परंतु उपस्थित असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान या घटने प्रकरणी पत्नीने पोलीस ठाणे गाठून पती विरोधात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि या घटनेचा पोलीस(Police) तपास करत आहे.

Chhatrapati Sambhajinagar News
Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com