Dance Viral Video: 'तेरे मेरे होंटो पें' रोमँटिक गाण्यावर काकींचा मनालीमध्ये जबरदस्त डान्स; ४० वर्षांनी पूर्ण केले स्वप्न; VIDEO VIRAL

A Women Dance On Sridevi song: स्वप्न पूर्ण करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. माणूस कोणत्याही वयात आपली स्वप्न पूर्ण करु शकतात. असंच स्वप्न एका महिलेने केले आहे. महिलेने मनाली येथे जाऊन श्रीदेवीच्या गाण्यावर डान्स केला आहे.
Dance Viral Video
Dance Viral VideoSaam Tv

नव्वदीच्या काळातील बॉलिवूडमधील चित्रपट सर्वांनाच खूप आवडतात. त्या काळातील प्रत्येकाचेच बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करण्याचे स्वप्न असेल. आपणही बॉलिवूडच्या अभिनेत्रींप्रमाणे परदेशात जाऊन डान्स करावा, असे अनेक महिलांना वाटत असेल. असंच एका महिलेचं स्वप्न ४० वर्षांनी पूर्ण झाले आहे. एका महिलेने ४० वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न पूर्ण केलं आहे. तिने कुलू मनालीला जाऊन अगदी श्रीदेवींसारखा डान्स केला आहे. याचाच व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हिडिओत एक महिला मनालीला जाऊन डान्स करताना दिसत आहे. तिने तेरे मेरे होंटो पें या गाण्यावर सुंदर डान्स केला आहे. महिलेच्या मुलाने हा व्हिडिओ शूट केला आहे. श्रीदेवी यांनी तेरे मेरे होंटो पें या गाण्यावर खूप सुंदर डान्स केला होता. त्याच गाण्यावर डान्स करण्याचे या महिलेचे स्वप्न होते. हेच स्वप्न तिच्या मुलाने पूर्ण केले आहे.

Dance Viral Video
Instagram Viral Video: अरे बापरे! भररस्त्यात अवतरली मंजुलिका, तरूणीचा खतरनाक डान्स VIDEO व्हायरल

अवी वाडेकर या कंटेट क्रिएटरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांना लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओवर 'तुम्ही फक्त साडीमधील महिला पाहत असाल परंतु आम्ही एक लहान मुलगी स्वप्न पूर्ण करताना बघत आहोत', अशी कमेंट ajiolife ने केली आहे. 'काकी सेम टू सेम श्रीदेवी', 'माझे आणि माझ्या आईचे स्वप्न कोणीतरी जगतंय असं मला वाटतंय', अशा कमेंट्स या व्हिडिओवर आल्या आहेत.

Dance Viral Video
London Viral Video: लंडनच्या बसस्टॉपवर मुंबईच्या लोकलसारखी गर्दी; बसमध्ये चढण्यासाठी प्रवाशांची धक्काबुक्की;VIDEO VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com