Instagram Viral Video: अरे बापरे! भररस्त्यात अवतरली मंजुलिका, तरूणीचा खतरनाक डान्स VIDEO व्हायरल

Manjulika Dance On Guwahati Street: इन्स्ट्राग्रामवरील एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आलाय. कारण या व्हिडिओमध्ये एक तरूणी मंजुलिकाच्या वेशभूषेत नाचताना दिसत आहे.
Instagram Viral Video
Instagram Viral VideoYandex

इन्स्ट्राग्रामवरील एक व्हिडिओ सध्या खूप चर्चेत आलाय. कारण या व्हिडिओमध्ये एक तरूणी मंजुलिकाच्या वेशभुषेत नाचताना दिसत आहे. इन्स्ट्राग्रामवरील हा व्हिडिओ चर्चेत येण्यामागे मोठं कारण आहे. ही तरूणी भरदिवसा रस्त्याच्या मध्यभागी मंजुलिकाच्या अवतारात डान्स करत आहे. आजकाल रील्सचं व्यसन लागलंय. या तरूणीने देखील रील्स बनविण्यासाठी माणसांनी गजबजलेल्या रस्त्याच्या मधोमध मंजुलिकाच्या अवतारामध्ये डान्स केला आहे.

रस्त्याच्या मधोमध मंजुलिका बनून नाचणाऱ्या तरूणीचं नाव प्रीती थापा असल्याची माहिती मिळतेय. प्रीती थापा शिलॉंगची आहे. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ (Instagram Viral Video) पोस्ट केला आहे. या व्हिडिओवर तिने 'मंजुलिका इन गुवाहाटी' असं लिहिलेलं आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमध्ये स्वत:ला मेगा मिस नॉर्थईस्ट 2012 असल्याचा उल्लेख केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक तरूणी गुवाहाटीमध्ये रस्त्याच्या मधोमध जबरदस्त नाचताना दिसत आहे.

रील बनवण्यासाठी आजकाल लोकं रस्ते, बाजारपेठा, मेट्रो आणि खचाखच भरलेल्या प्रवासी गाड्यांमध्ये देखील नाचत आहेत. आता हा व्हिडिओ आसामच्या गुवाहाटीमधला आहे. ही तरूणी अगदी विचित्र अवतारामध्ये रस्त्यात नाचत (Instagram Video) आहे. ती भुल भुलैय्या चित्रपटातील 'आमी जे तोमार' या गाण्यावर नाचत आहे. तिने अगदी त्या मंजुलिकासारखी वेशभूषा केली आहे. तिचे केस विस्कटलेले दिसत आहेत. तिने हिरव्या रंगाची साडी घातलेली आहे. तिच पेहराव बघून लोकांचं लक्ष (Viral News) तिच्याकडे वेधलं जात आहे.

Instagram Viral Video
Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

आता तिच्या या व्हिडिओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका तर, प्रिय मंजुलिका कृपया वाहतूक नियमांचे पालन करा अशी कमेंट केली आहे. अनेकजण तिच्या आत्मविश्वासाचं कौतुक करत (Viral Video) आहेत. परंतु नाचताना तिने हुबेहुब मंजुलिकाची व्यक्तिरेखा साकारली आहे. चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे अगदी ओरिजनल मंजुलिकासारखे आहेत. परंतु वर्दळीच्या ठिकाणी असं नाचणं जीवावर देखील बेतु शकतं. अनेकदा रील्सच्या नादामध्ये मोठमोठे अपघात झाल्याचं आपण ऐकतो.

Instagram Viral Video
Pakistan Viral Video: भारत चंद्रावर पोहचलाय, आमची मुले गटारात पडून मरताहेत; पाकिस्तानी संसदेत भारताचं कौतुक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com