Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

Boy Stunt Video: कधी कोणी बाईकवर स्टंट करतं, कोणी चालत्या कारमध्ये स्टंट करतं, तर कोणी उंच इमारतीवरून उडी मारत स्टंटबाजी करतं. हे स्टंट करण्यात काही जण यशस्वी होतात तर काही जण स्टंट करताना पडतात.
Boy Stunt Video
Boy Stunt VideoSaam Tv

सोशल मीडिया (Social Media) हे असं प्लॅटफॉर्म आहे ज्याठिकाणी दररोज नवनवीन व्हिडीओ पाहायला मिळतात. या ठिकाणी प्रत्येक व्हिडीओची चांगलीच चर्चा होत असते. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळावी यासाठी अनेक जण काहीही करतात. अशामध्ये स्टंट करतानाचे अनेकांचे व्हिडीओ (Viral Video) चांगलेच व्हायरल होतात.

मग कधी कोणी बाईकवर स्टंट करतं, कोणी चालत्या कारमध्ये स्टंट करतं, तर कोणी उंच इमारतीवरून उडी मारत स्टंटबाजी करतं. हे स्टंट करण्यात काही जण यशस्वी होतात तर काही जण स्टंट करताना पडतात. आता सोशल मीडियावर असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल होता आहे. जो रस्त्यावर स्केटिंग करताना जोरात पडतो. काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण रस्त्यावर स्केटिंग शूज घालून स्केटिंग करताना दिसत आहे. स्केटिंग करत हिरोगिरी करणं या तरुणाला चांगलेच महागात पडले. कारण स्केटिंग करत असताना तो एका भरधाव कारचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतो. तो कार जवळ पोहचतो खरा पण त्याचा तोल जातो आणि तो रस्त्यावर जोरात पडतो. हा तरुण इतक्या जोरात पडतो की तो तीन ते चार वेळा रस्त्यावर उलटा-पालटा होतो.

व्हिडीओ पाहताना तुम्हाला देखील अंदाज येईल की या तरुणाला चांगलीच गंभीर दुखापत झाली असेल. हा तरुण स्केटिंग करत असताना त्याचे मित्र दुसऱ्या बाईकवरून त्याचा व्हिडीओ शूट करत असतात. अशामध्ये हा स्टंट करणं या तरुणाला चांगलेच महागात पडल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून जर कोणी रस्त्यावर अशाप्रकारचे स्टंट करत असतील तर त्यांनी काळजी घेणे गरजेचे आहे.

Boy Stunt Video
Mumbai Local Viral Video: लोकलच्या लेडीज डब्याजवळील ही भयंकर गर्दी बघा; धडकी भरवणारा ठाणे स्टेशनवरचा VIDEO

हा तरुण स्टंट करताना ज्यापद्धतीने पडला त्यावरून तो पुन्हा अशाप्रकारचे स्टंट करण्याची हिंमत करणार नसल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ @nikkym143 नावाच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अपलोड करण्यात आला आहे. हा 15 सेकंदांचा व्हिडिओ 3 लाख 69 हजारांपेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर काहींनी अशाप्रकारचे स्टंट करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Boy Stunt Video
Viral Video: घोडा शर्यतीदरम्यान टांगा उलटला; घोडे रस्त्यावर घसरले, अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com