Healthy Chutney : महिलांच्या विविध आजारांसाठी गुणकारी चटणी; एकदा खाऊन तर पाहा

Healthy Chutney For Women : कामाच्या व्यापात महिलांना पौष्टीक पदार्थ नेमके कधी खावेत हे समजत नाही. त्यामुळे महिलांना होणाऱ्या विविध आजारांवर एक रामबाण चटणी आम्ही शोधली आहे.
Healthy Chutney
Healthy ChutneySaam TV

महिलांना वयानुसार आरोग्याशी संबंधित विविध समस्या जाणवतात. महिलांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आणि हिमोग्लोबीन कमी असते त्यामुळे त्या पटकन आजारी पडतात. तसेच सांधेदुखी, कंबरदुखी अशा विविध समस्या महिलांना जानवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी अनेक महिला वैद्यकीय उपचार घेतात.

Healthy Chutney
Healthy Laddu Recipe: वयाच्या तिशीनंतरही हाडे राहातील दणकट, रोज खा एनर्जी बूस्टर लाडू; पाहा रेसिपी

मात्र फक्त वैद्यकीय उपचार पुरेसे नसतात. त्यासाठी तुमच्या आहारात देखील बदल करणे गरजेचे असते. डॉक्टरांकडून देखील महिलांना आहारात विविध पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. काही महिलांना डायेट प्लान देखील दिला जातो. मात्र कामाच्या व्यापात त्यांना हे पदार्थ नेमके कधी खावेत हे समजत नाही. त्यामुळे महिलांना होणाऱ्या विविध आजारांवर एक रामबाण चटणी आम्ही शोधली आहे.

@Cooking ticket marathi या युट्यूब अकाउंटवर सदर रामबाण चटणीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ही चटणी रोजच्या जेवणात एक चमचा खाल्ल्यानतंर सांधेदुखी, वात, पित्त, कंबरदुखी, हिमोग्लोबीन वाढण्यास मदत होते.

साहित्य

खुरसणी १ वाटी १०० ग्राम

पांढरे तिळ पाव वाटी

शेंगदाणे पाव वाटी

लसूण पाव वाटी

सैंधव मिठ

काश्मिरी मिरची पावडर

कृती

सर्वात आधी एका कढईत खुरसणी लो फ्लेमवर भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये पांढरे तिळ आणि शेंगदाणे टाका. लसूण सर्वात थेवटी थोडासा भाजून घ्या. त्यानंतर हे सर्व मिश्रण एकत्र करून मिक्सराला वाटतानाच त्यामध्ये जिरे, मीठ आणि काश्मिरी मिरची पावडर टाकून घ्या.

Healthy Chutney
Yoga Diet: योगा केल्यानंतर प्या हे Healthy Drinks, आराम वाटेल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com