ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी योगा करणे फायदेशीर आहे.
योगा केल्याने अनेक आजार दूर होतात. शरीर निरोगी राहते.
योगा करताना तुमच्या शरीराची हालचाल होते. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होऊ शकतो.
उन्हाळ्यात स्वतःला हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. योगा केल्यानंतर तुम्ही पेयांचे सेवन करा.
नारळपाणी हे शरीरासाठी चांगले असते.त्यातील पोटॅशियम आणि मॅग्नेशियम तुमच्या शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात.
लिंबामधील विटामिन सी तुमची पचनसंस्था सुरळीत करते. योग झाल्यानंतर तुम्ही लिंबू पाणी पिऊन तुम्हाला हायड्रेट ठेवू शकतात.
योगानंतर भाज्यांचा रस पिणे चांगले असते. तुम्ही काकडी, गाजरचा रस पिऊ शकतात. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
कोरफडमधील जीवनसत्त्वे, खनिजे, अँटीऑक्सिडंट्स पचनसंस्था सुरळीत करण्यास मदत करणे. यामुळे तुमची रोगप्रतिकारकशक्ती वाढते.