ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहे. राज्यात काही ठिकाणी ४०-४५ अंश तापमान आहे.
कडाक्याच्या उन्हात घराबाहेर पडणे खूप जास्त अवघड आहे. जास्त वेळ उन्हात राहिल्याने चक्कर येणे, बीपीचा त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात उष्माघाताच्या त्रासापासून स्वतः चा बचाव करण्यासाठी या गोष्टी करा.
उन्हाळ्यात डायड्रेट राहण्यासाठी दिवसातून ७-८ ग्लास पाणी प्यावे. यामुळे अशक्तपणा येत नाही. उन्हाळ्यात तुम्ही वेगवेगळ्या फळांचे ज्यूस, नारळपाणी पिऊन स्वतः ला हायड्रेट ठेवू शकता.
उन्हाळ्यात चहा- कॉफी जास्त प्रमाणात पिऊ नये. चहा कॉफी गरम असतात. त्यामुळे शरीराला त्रास होऊ शकतो.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यात तुम्ही डोळ्यांना सनग्लासेस किंवा स्कार्फ बांधावा.
तुम्ही उन्हाळ्यात टॅनिंगपासून वाचण्यासाठी सनस्क्रिन लावावे.
सकाळी घरातून बाहेर पडताना पोटभर नाश्ता करावा. रिकाम्या पोटी अनेकांना चक्कर येते.