Soya Chilli Recipe
Soya Chilli RecipeSaam tv

Soya Chilli Recipe: पावसाळ्यात चटपटीत व टेस्टी पदार्थांची चव चाखायची आहे? ट्राय करा सोया चिली, पाहा रेसिपी

How To Make Soya Chilli : पावसाळ्यात आपल्याला टेस्टी व चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते?
Published on

Monsoon Recipe : पावसाळ्यातील गारव्यात आपल्याला गरमागरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. गरमागरम कांदा भजी व बटाटा भजीवर ताव मारायला आपण कधी सुरुवात करतो आणि कधी फस्त होतात हे देखील कळत नाही.

मागच्या काही वर्षांपासून भारतात चायनीज फूडचे क्रेझ सर्वच वयोगटातील मुलांना लागले आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र त्याचा ट्रेंड पाहायला मिळतो. पावसाळ्यात आपल्याला टेस्टी व चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण तुम्ही देखील सतत कांदा व बटाटा भजी खाऊन वैतागले असाल तर सोया चिली रेसिपी ट्राय करुन पाहू शकता. जाणून घेऊया बनवण्याची पद्धत

Soya Chilli Recipe
Crispy Dosa Recipe : डाळ-तांदूळ न भिजवता 10 मिनिटांत बनवा क्रिस्पी डोसा, पाहा रेसिपी

1. साहित्य

  • सोयाबीन - १ कप

  • मीठ - चवीनुसार

  • कॉर्नफ्लोर - ४ चमचे

  • हळद - 1 टीस्पून

  • गरम मसाला (Masala) - 1 टीस्पून

  • काळी मिरी - 1 टीस्पून

  • लाल तिखट - 1 टीस्पून

  • आले-लसूण (Garlic) पेस्ट - 1 टीस्पून

  • हिरवी मिरची - २ (बारीक चिरून)

  • काळा सोया सॉस - 2 चमचे

  • लाल मिरची सॉस - 2 चमचे

  • टोमॅटो केचप - 2 चमचे

  • हिरवे कांदे - २ (बारीक चिरून)

  • तीळ - 1 टीस्पून

  • आवश्यकतेनुसार तेल (Oil)

Soya Chilli Recipe
Besan Bhindi Recipe : कितीही चांगली बनवली तरी भेंडी चिकट होते ? मग याप्रकारे ट्राय करुन पाहा, बनेल टेस्टी

2. कृती

1. सोया चिली बनवण्यासाठी प्रथम सोयाबीनला गरम पाण्यात 10 मिनिटे भिजत ठेवा.

2. नंतर सोयाबीनचे पाणी वेगळे करा आणि त्यात सर्व मसाले, मीठ आणि सर्व पावडर मसाले टाका.

3. त्यात कॉर्नफ्लोअर आणि आले आणि लसूण पेस्ट एकजीव करुन घ्या.

Soya Chilli Recipe
Astro Tips : कासवाची अंगठी करते मालामाल! बोटात घालण्यापूर्वी नियम ही जाणून घ्या

4. हे सर्व चांगले मिसळा आणि तळून घ्या.

5. नंतर कढईत तेल, कांदा, हिरवी मिरची वगैरे सर्व भाज्या टाका.

6. नंतर ते तळून घ्या आणि त्यात सर्व सॉस मिक्स करा.

7. त्यात कॉर्नफ्लोअर आणि पाणी मिसळा आणि त्यात सोयाबीन घाला.

8. गरमागरम सर्व्ह करा सोया चिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com