Shili Chapati Recipe: रात्रीची चपाती उरलीये? फेकून देऊ नका; झटपट बनवा नाश्त्यासाठी भन्नाट रेसिपी

Stale Chapati Recipe in Marathi: सकाळी घाईच्या वेळात उरलेल्या चपात्यांचा उत्तम नाश्ता बनवू शकता. त्याची सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसेपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.
Shili Chapati Recipe: रात्रीची चपाती उरलीये? फेकून देऊ नका; झटपट बनवा नाश्त्यासाठी भन्नाट रेसिपी
Stale Chapati RecipeSaam TV

रात्रीच्या जेवणात अनेकांना डाळ, भात, भाजी, चपाती असं सर्वच हवं असतं. जेवण सर्वांना पुरावं कुणालाही कमी पडूनये यासाठी जेवण बनवणारी महिला जास्तीचे पदार्थ बनवते. आता जास्तीचं जेवण बनवल्यावर ते नेहमी संपूर्ण संपतच असं नाही. अनेकदा रात्रीच्या चपात्या तशाच उरतात.

Shili Chapati Recipe: रात्रीची चपाती उरलीये? फेकून देऊ नका; झटपट बनवा नाश्त्यासाठी भन्नाट रेसिपी
Soft Chapati Making Tips: मऊ लुसलुशीत चपातीसाठी अशी मळा कणीक; दिवसभर पोळ्या राहतील मऊ

रात्रीच्या उरलेल्या चपाच्या काही व्यक्ती फेकून देतात किंवा मग कुत्र्यांना खाण्यासाठी देतात. मात्र असे न करता तुम्ही सकाळी घाईच्या वेळात अशा चपात्यांचा उत्तम नाश्ता बनवू शकता. त्याची सिंपल आणि झटपट तयार होणारी रेसेपी आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.

साहित्य

  • रात्रीच्या उरलेल्या चपात्या

  • एक कांदा

  • हिरवी मिरची

  • जिरे आणि मोहरी

  • हळद आणि मीठ

  • कोथिंबीर

कृती

सर्वात आधी रात्रीच्या चपात्यांचे लहान तुकडे करून घ्या. चपात्या जास्त कडक झाल्या असतील तर त्या १ मिनिटे पाण्यात भिजवून ठेवा. त्यानंतर लगेचच पाणी गाळून घ्या. पाणी गाळून झाल्यावर चपातीचे ओले तुकडे झाकून ठेवा. असे केल्याने कडक झालेली चपाती अगदी ओठाने तुटावी इतकी नरम होते.

पुढे कांदा बारीक चिरून घ्या. तसेच कोथिंबीर आणि हिरवी मिरची देखील अगदी बारीक चिरून घ्यावी. यानंतर एक कढई गॅसवर ठेवा. त्यात तेल अॅड करा. तेल थोडं गरम झाल्यावर त्यामध्ये आधी मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यात जिरे मिक्स करा. त्यानंतर यामध्ये मिरची आणि कांदा चांगला परतून घ्या. कांदा छान लालसर होईपर्यंत परता. पुढे यामध्ये हळद आणि मिठ मिक्स करून घ्या.

सर्व मिश्रण एकजीव झाल्यावर चपात्यांचे तुकडे यामध्ये टाका. हे सर्व तुकडे तेखील तयार मसाल्यात छान मिक्स करून घ्या. त्यानंतर झाकन ठेवून ५ मिनिटे वाफेवर पदार्थ तयार होऊ द्या. बस यानंतर कोथिंबीर टाकून चपात्यांच्या चुऱ्याची ही झटपट तयार होणारी रेपिसी तयार.

Shili Chapati Recipe: रात्रीची चपाती उरलीये? फेकून देऊ नका; झटपट बनवा नाश्त्यासाठी भन्नाट रेसिपी
Ghee Chapati: तूप चपाती खाल्यास खरचं वजन वाढतं का?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com