12 मार्च 1993..... दहशतवाद्यांनी साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईत रक्ताचा सडा पाडला होता...याच विध्वंसक हल्ल्याची आठवण आज 33 वर्षांनी पुन्हा एकदा झाली.... कारण पुन्हा एकदा मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवण्याची खलिस्तानी दहशतवाद्यांनी दिलेली धमकी..
ठिकाण - विधानभवन
वेळ- सकाळी 6 वाजून 57 मिनिटं
खलिस्तानी दहशदवाद्यांच्या नावानं विधानभवनात ई-मेल आला... आणि पोलीस यंत्रणेची झोप उडाली...
डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, स्थानिक पोलीस, गुप्तचर यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या... आणि विधानभवनात सुरु झाला तपासाचा सिलसिला....
विधानभवन उडवून देण्याच्या धमकीबाबत खुद्द विधानपरिषदेचे उपसभापती राम शिंदेंनी दुजोरा दिलाय....एवढंच नाही तर याच ई-मेलमध्ये मुंबईतील आणखी 4 महत्वाची ठिकाणं उडवून देण्याची धमकी दिल्याचं राम शिंदेंनी म्हटलंय..
विधानभवन, उच्च न्यायालय, बॉम्बे स्टॉक एक्चेंज, महत्वाच्या बँका आणि मेट्रोवर मिसाईल आणि बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानं आता यंत्रणा हाय अलर्टवर आल्या आणि .... प्रत्येक ठिकाणी कसून तपासणी सुरू झाली. फक्त विधानभवन आणि हायकोर्टच नाही तर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजही बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिल्यानं सुरक्षा पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय..
एवढंच नाही तर धमकीच्या मेलमध्ये कोणतं ठिकाण किती वाजता उडवणार याचीही वेळ देण्यात आली होती.... मुंबईतील मेट्रो सकाळी 9 वाजून 11 मिनिटं... मुंबई स्टॉक एक्स्चेंज 12 वाजून 11 मिनिटं.... बँका 1 वाजून 1 मिनिटं... हायकोर्ट 2 वाजून 11 मिनिटं.... विधानभवन 3 वाजून 11 मिनिटांनी उडवण्याची धमकी मेलमध्ये दिलीये....मात्र पोलिसांच्या चौकशीनंतर ही अफवा असून मेलमधील धमकी खोटी असल्याची माहिती सरकारनं दिलीय...
आधी दिल्लीत बॉम्बस्फोट... आणि आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील आर्थिक आणि राजकीय पॉवर सेंटर उडवण्याच्या धमकी दिलीय..एका बाजूला जळणाऱ्या आखाताचे चटके मुंबईला बसत असतानाच मुंबईत विध्वंस घडवण्याचा कट खलिस्तानी दहशतवाद्यांनी आखलाय.... मात्र या धमकीची वेळ सरलीय.... मात्र रात्र वैऱ्याची आहे....त्यामुळे सावध व्हा सतर्क रहा पण अजिबात घाबरु नका... कारण आपल्या मुंबई पोलिसांनीच जगात पहिल्यांदाच जिंवत दहशतवादी पकडून मुंबईकरांचं संरक्षण केलं होतं हे विसरुन चालणार नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.