Karlyachi Bhaji Recipe: कारल्याची भाजी 'या' पद्धतीने बनवाल तर अजिबात कडू लागणार नाही; वाचा रेसिपी

Karlyachi Bhaji Recipe In Marathi : खरंतर कारल्याची भाजी बनवण्याची परफेक्ट रेसिपी अनेकांना माहिती नाही, त्यामुळे आज आम्ही या भाजीची परफेक्ट रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे.
Karlyachi Bhaji Recipe In Marathi
Bitter Gourd RecipeSaam TV
Published On

कारलं चवीला कडू लागतं. त्यामुळे अनेक व्यक्ती आहारात करलं खात नाहीत. मात्र कारल्याच्या भाजीमध्ये मोठ्याप्रमाणात जीवनसत्व असतात. कारले न खाल्ल्याने आपल्या शरीराला हे जीवनसत्व मिळत नाहीत.

Karlyachi Bhaji Recipe In Marathi
Peanut Butter Cookies Recipe: आता शाळा सुरू झाली, मुलांना टिफिनमध्ये काय द्याल? पीनट बटरपासून बनवा चवदार 'कुकीज'...

कारल्याची भाजी घरात कोणी खात नाही त्यामुळे अनेक महिला देखील ही भाजी बनवण्याचा कंटाळा करतात. खरंतर कारल्याची भाजी बनवण्याची परफेक्ट रेसिपी अनेकांना माहिती नाही, त्यामुळे आज आम्ही या भाजीची परफेक्ट रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे.

साहित्य

कारले

मीठ

चिंच

शेंगदाणे

जिरे

धने

खोबरं

तेल

हळद

मिरची

कांदा

कृती

सर्वात आधी करले छान स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्याच्या शिरा काढून ते सोलून घ्या. करले सोलत असताना त्याच्यावर असलेला खरबुडीत भाग देखील काढून टाका. तसेच आतील बिया काढून घ्या.

त्यानंतर या कारल्याला मीठ, हळद लावून झाकून ठेवा. किमान अर्धा जास्त यामध्ये मीठ छान मुरू द्या. तुम्हाला आंबट चव आवडत असेल तर चिंचेचं पाणी किंवा कोकमचं पाणी देखील तुम्ही कारले भिजत ठेवण्यासाठी वापरू शकता. असे केल्याने त्यातील कडवटपणा निघून जातो.

नंतर कारल्यासाठी थोडा मसाला बनवून घ्या. मसाला बनवताना आधी शेंगदाणे गॅसवर खमंग भाजून घ्या. त्याची साल काढून मिक्सरला थोडा जाड भरडा कूट करून घ्या. त्यानंतर थोडं सुकं खोबरं, जिरे, मिरची आणि चवीनुसार मीठ मिक्स करून छान मिक्सरला हे मिश्रण देखील बारीक करून घ्या.

त्यानंतर कढई घ्या. यामध्ये थोडं तेल टाका. तेलात आधी जिरे फोडणी द्या. त्यानंतर एक कांदा अगदी बारीक चिरून मिक्स करा. यात तयार मसाला आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घ्या. सर्व मिश्रण थोडं गरम झालं की यात कारल्याचे काप मिक्स करा. तयार झाली तुमची गोड कारल्याची भाजी.

Karlyachi Bhaji Recipe In Marathi
Vegetable Lollypop Recipe: एकदम चटकदार! घरच्या घरी बनवा सोप्या पद्धतीनं बनवा व्हेजिटेबल लॉलीपॉप

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com