महाराष्ट्रासाठी काही करायचं असेल, तर....; राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र

Raj Thackeray News : राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरमध्ये बैठका घेतली. या बैठकीत राज ठाकरेंनी मनसैनिकांना कानमंत्र दिला.
Raj Thackeray news
MNS chief Raj Thackeray Saam Tv
Published On
Summary

मनसेने रायगड किल्ल्यावरून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात

राज ठाकरे यांनी घाटकोपर येथे पदाधिकाऱ्यांसोबत घेतली बैठक

गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर घेतली बैठक

बैठकीत उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिला कानमंत्र

मयूर राणे, साम टीव्ही

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाने पुन्हा एकदा संघटन बांधणीवर लक्ष केंद्रित केलं आहे. मनसेने सदस्य नोंदणी अभियानाला सुरूवात केली आहे. रायगड किल्ल्यावरून मनसेने सदस्य नोंदणीला सुरुवात केली. राज ठाकरेंनी सदस्य नोंदणीसोबत मुंबईतील विविध विभागात गुढीपाडव्यासाठी बैठका घेण्यासही सुरुवात केली आहे. राज ठाकरेंचा ईशान्य मुंबईत झालेल्या मेळाव्यात मनसैनिकांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रासाठी काही करायचं असेल, तर आपाआपसात वाद करून चालणार नाही, असा कानमंत्र राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला.

Raj Thackeray news
प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत घाटकोपरमध्ये महत्वाची बैठक झाली. या बैठकीला मनसेचे कुर्ला ते मुलुंड या सर्व पदाधिकारी यांना बोलवण्यात आलं होतं. बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांन संबोधित केलं.

काल एक बैठक गोरेगावला पार पडली, तर आज गुरुवारी ही बैठक घाटकोपरला झाली. गुढीपाडवा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या ३ प्रमुख बैठका झाल्या. त्यानंतर आज घाटकोपरमध्ये झालेल्या बैठकीत राज ठाकरेंनी महत्वाचे मुद्दे मांडले.

Raj Thackeray news
कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

राज ठाकरे काय म्हणाले?

'पैशांपेक्षा पक्षाचा स्वाभिमान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपा. पदाधिकाऱ्यांनी आपापसातले वाद मिटवावेत. तुम्हाला महाराष्ट्रासाठी काही करायचं असेल, तर असे आपाआपसात वाद करून चालणार नाही. महाराष्ट्रासाठी एकत्र या. सचिन तेंडुलकर पुढे जावा म्हणून ज्याप्रमाणे त्याच्या मोठ्या भावाने त्याग केला, तसं तुम्ही देखील आपला सहकारी पुढे जावा म्हणून केलं पाहिजे, असं राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com