कालव्यात पोहोयला गेले पुन्हा परतलेच नाही; पाण्यातील सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ तरुणांचा मृत्यू

satara shocking News : साताऱ्यात कालव्यात पोहोयला गेलेल्या तिघांचा मृत्यू झाला. सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाला.
Satara news
satara shocking NewsSaam tv
Published On
Summary

साताऱ्यात धोम-बलकवडी कालव्यात घडली भीषण दुर्घटना

सिमेंट पाईपमध्ये अडकून ३ परप्रांतीय तरुणांचा मृत्यू

ओडिशातील तिघेही कामानिमित्त साताऱ्यात राहत होते

साताऱ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील धोम-बलकवडी कालव्यात गुदमरून ओडिशा राज्यातील ३ परप्रांतीय तरुणांचा मृत्यू झाला आहे. हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती येथे ही घटना घडली. सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने तिघांवर काळ ओढवला.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील हिंगणगाव-आदर्की रस्त्यावरील सुळवस्ती येथे गुरुवारी दुपारी धक्कादायक घटना समोर आली. धोम-बलकवडी प्रकल्पाच्या पोटकालव्यामध्ये तीन परप्रांतीय तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच गुदमरून मृत्यू झाला. मृतांमध्ये २० ते ३५ वयोगटातील ओडिसा राज्यातील तरुणांचा समावेश आहे.

Satara news
राज्याच्या प्रशासनात पुन्हा मोठा उलटफेर; बड्या IAS अधिकाऱ्याची बदली, कुठे झाली नियुक्ती?

या दुर्घटनेत ज्योतीराम नाईक ,श्रीराम जगाई हेबरम, सतीन बीवजी नाईक तिघेही मूळचे ओडिशा राज्यातील असून कामानिमित्त सातारा जिल्ह्यात वास्तव्यास होते. या घटनेची माहिती मिळताच लोणंद पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिन्ही युवकांचे मृतदेह सिमेंटच्या पाईपमधून बाहेर काढले आहेत. या घटनेची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Satara news
रायगडमध्ये पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींची निवड; यादी आली समोर

नेमकं काय घडलं?

कामानिमित्त साताऱ्याला आलेले ओडिशा राज्यातील तिन्ही तरुण मित्र धोम-बलकवडी कालव्यात पोहोयला आले. तिघे जण भर दुपारी कालव्यात उतरले. परंतु तिघांना पोटकालव्यामध्ये सिमेंट पाइपचा अंदाज आला नाही. तिघेही तरुण सिमेंट पाईपमध्ये अडकले. या तिघांचा गुदमरून मृत्यू झाला. तिघांच्या मृत्यूने गावात खळबळ उडाली.

Satara news
IAS अधिकाऱ्याच्या फार्महाऊसवर रंगला जुगाराचा डाव; अचानक टाकली धाड, कारवाईत ३ पोलीस कर्मचारी सापडले

या दुर्घटनेनंतर स्थानिकांची घटनास्थळी एकच गर्दी झाली. पोलिसांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. त्यानंतर तिघांच्या कुटुंबायांना माहिती दिली. नातेवाईकांकडे तरुणांचे मृतदेह दिले जातील. तिघांच्या मृत्यूने त्यांच्या इतर सहकाऱ्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com