प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडला; लग्नानंतर अवघ्या ४ वर्षांनी झाले वेगेळे

actress hansika motwani : प्रसिद्ध अभिनेत्रीचा संसार मोडलाय. दोघे जण लग्नानंतर ४ वर्षांनी वेगले झालेत.
actress hansika motwani divorce
actress hansika motwani Saam tv
Published On
Summary

अभिनेत्री हंसिका आणि सोहेल कथूरिया यांचा घटस्फोट

दोघांचा विवाह डिसेंबर २०२२ मध्ये झाला होता

लग्नानंतर अवघ्या चार वर्षांनी दोघे झाले वेगळे

साऊथ आणि बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. हंसिका आणि पती सोहेल कथूरिया या दोघांचा घटस्फोट झालाय. दोघांचं लग्न डिसेंबर २०२२ मध्ये झालं होतं. दोघे लग्नाच्या ४ वर्षांनंतर एकमेकांशी वेगळे झाले आहेत. मुंबईतील वांद्रे कोर्टाने दोघांचा घटस्फोटाला मंजुरी दिली, अशी माहिती समोर आली आहे.

actress hansika motwani divorce
बिश्नोई गँगच्या नावाने खंडणी मागितली, सलग ५ दिवसांपासून जीवे मारण्याचा धमक्या; आरोपी असा अडकला जाळ्यात

हंसिकाने सोहेल यास पॅरिसमध्ये लग्नासाठी प्रपोज केला होता. २०२२ साली डिसेंबरमध्ये जयपूरच्या मुंडोता फोर्टमध्ये दोघांचे लग्न झालं. त्यांच्या लग्नाचा क्षण हा 'हंसिका लव्ह शादी ड्रामा' नावाच्या वेबसीरीजच्या माध्यामातून चाहत्यांना पाहायला मिळाला.

हंसिका मोटवानीचे वकील अदनान शेख यांनी सांगितलं की, दोघांचे वैचारिक मतभेद वाढले होते. दोघांचे करिअर वेगवेगळ्या क्षेत्रातील असल्याने त्यांच्या नात्यातील दुरावा वाढत होता'. हंसिका आणि सोहेल यांनी अद्याप अधिकृतरित्या वेगळे झाल्याची घोषणा केलेली नाही. परंतु दोघांचे सोशल मीडियावर एकत्र फोटो दिसणे कमी झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

actress hansika motwani divorce
दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला; प्रवाशांमध्ये एकच खळबळ, VIDEO

हंसिका आणि सोहेल यांचं नाते खरंतर वादातून सुरू झालं. कारण सोहेल कथूरिया याची हंसिका ही दुसरी बायको होती. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव रिंकी बजाज होते. ती हंसिकाची चांगली मैत्रीण होती. हंसिका आणि सोहेलच्या लग्नाची बातमी समोर आली. त्यावेळी तिच्यावर मैत्रीणीचं घर फोडल्याचा आरोप झाला. परंतु हंसिकाने आरोप फेटाळून लावले होते.

Q

 कोणत्या अभिनेत्रीचा घटस्फोट झालाय?

A

प्रसिद्ध अभिनेत्री हंसिका मोटवानीचा पती सोहेल कथूरियासोबत घटस्फोट झालाय.

Q

हंसिकाचे लग्न कधी झाले होते?

A

अभिनेत्री हंसिका आणि सोहेल कथूरिया यांचं लग्न डिसेंबर २०२२ मध्ये झालं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com