Kargil Vijay Diwas Saam Tv
लाईफस्टाईल

Kargil Vijay Diwas: पाकिस्तानला धूळ चारत भारताच्या 'या' सैनिकांनी जिंकलं कारगिल युद्ध ;शौर्य ऐकून आजही डोळ्यात येतं पाणी

Siddhi Hande

२६ जुलै १९९९ हा दिवस भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा ठरला. २५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत- पाकिस्तान बॉर्डरवर कारगिल युद्ध झाले होते. भारतीय सैन्याने कारगिल युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या या विजयाला आज २५ वर्ष पूर्ण झाली. या युद्धात ५२७ जवानांनी बलिदान दिले. या विजयासाठी ज्या सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

कॅप्टन विक्रम बत्रा

कॅप्टन विक्रम बत्रा यांना द्रासचा वाघ म्हणून ओळखले जाते. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्यांनी कारगिल युद्धात आपले प्राण गमावले. त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले . त्यांना कारगिल हिरो म्हणून आजही ओळखले जाते. त्यांच्या आयुष्यावर आधारित शेरशाह हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला आहे.

लेफ्टनंट बलवान सिंग

लेफ्टनंट बलवान सिंग यांना 'टायगर ऑफ टायगर हिल' असेही म्हटले जाते. त्यांनी टायगर हिल ताब्यात घेण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. वयाच्या २५ व्या वर्षी त्यांनी या मोहिमेची जबाबदारी स्वतः च्या खांद्यावर घेतली होती. त्यांना त्यांच्या शौर्यासाठी महावीर चक्राने सन्मानित करण्यात आले होते.

ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव

योगेंद्र सिंह यादव हे परमवीर चक्र प्राप्त करणारे सर्वात तरुण सैनिक होते. त्यांना ऑगस्ट १९९९ मध्ये परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. कारगिल युद्धात त्यांच्या रेजिमेंटने टोलोलिंग टॉपवर कब्जा केला. यामध्ये २१ सैनिक शहीद झाले होते.

लेफ्टनंट मनोजकुमार पांडे

लेफ्टनंट मनोजकुमार पांडे यांनी कारगिल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांना शौर्य पुरस्कार, परमवीर चक्राने सन्मानित करावे, अशी त्यांची इच्छा होती, असे त्यांच्या वडिलांनी सांगितले. त्यांनी या युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना मरणोत्तर शौर्य पुरस्कार, परमवीर चक्र या पुरस्काराने सन्मानित केले.

संजय कुमार

संजय कुमार यांनी कारगिल युद्धात मुश्कोह व्हॅलीमधील पॉइंट ४८७५ शिखरावर कब्जा करण्याचे काम केले. त्यांनी या युद्धात स्वतः चे प्राण गमावले. त्यांच्या या बलिदानाला भारत देश कधीच विसरणार नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT