Saamana Editorial: ‘कारगिल युद्ध पाकिस्तानची चूक,’; पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांच्या जाहीर कबुलीनंतर ठाकरे गटाची टीका

Thackeray Group Criticized On Nawaz Sharif Statement: ठाकरे गटाने पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर सामनाच्या अग्रलेखातून टीका केली आहे. नवाझ शरीफ यांनी कारगिल युद्ध पाकिस्तानची चूक असल्याचं वक्तव्य केलं आहे.
ठाकरे गटाची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर टीका
Thackeray Group Criticized On Nawaz Sharif StatementSaam Tv

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कारगिल यु्द्धावरून मोठं विधान केलं आहे. त्यावरून मात्र ठाकरे गटाने त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नवाझ शरीफ यांना उशिरा सुचलेले शहाणपण असा घणाघात सामनाच्या अग्रलेखातून ठाकरे गटाने केला आहे. लाहोर करार तोडणे आणि कारगिलचे युद्ध हिंदुस्थानवर लादणे ही चूक असल्याची कबुली पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांनी दिलीय.

नेमकं नवाझ शरीफ काय म्हणाले?

पाकिस्तानच्या पहिल्या अणुचाचणीला २८ मे रोजी २६ वर्षे पूर्ण झाली आहे. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना नवाझ शरीफ यांनी ‘कारगिल युद्ध पाकिस्तानची चूक असल्याची जाहीर कबुली दिलीय. शरीफ म्हणाले की, २८ मे १९९८ रोजी पाकिस्तानने पाच अणुचाचण्या केल्या होत्या. त्यानंतर काही महिन्यांनी हिंदुस्थानचे तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पाकिस्तानच्या दौऱ्यावर आले होती. त्यावेळी वाजपेयी यांनी पाकिस्तानसोबत लाहोरमध्ये शांतता करार केला (Nawaz Sharif Statement On India Pakistan) होता.

दोन्ही देशांनी या करारावर स्वाक्षऱ्या देखील केल्या होत्या. मात्र, हा लाहोर करार पाकिस्तानने तोडला. पाकिस्तानने कारगिलमध्ये गुप्तपणे सैन्य पाठवले आणि हिंदुस्थानसोबत युद्ध झालं.कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नवाझ शरीफ (Nawaz Sharif) यांनी हे सत्य पाकिस्तानच्या जनतेसमोर मांडलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाने (Thackeray Group) नवाझ शरीफ यांच्यावरच निशाणा साधला आहे.

ठाकरे गटाची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर टीका
Raj Thackeray : फडणवीसांना दिल्लीला जायचंय, मी चायनीजची ऑर्डर दिलीये, आम्ही निघतो; मुलाखतीत राज ठाकरेंचं मिश्किल उत्तर

साऱ्या जगाला हे सत्य २५ वर्षांपूर्वीच ठाऊक होते. आता त्याची कबुली देऊन काय उपयोग? असा सवाल सामनामधून विचारला गेलाय. त्यामुळे जुने सत्य चघळत बसण्याऐवजी कारस्थानी उद्योग थांबवले तरी खूप झाले, असा परखड टोला सामनामधून लगावला गेला आहे. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे कारगिल युद्धावरील विधान उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये (Saamana Editorial) म्हटलं आहे.

ठाकरे गटाची पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर टीका
Aditya Thackeray: श्रेय लाटण्यासाठी घाईत १ लेन उघडलं; कोस्टल रोड गळतीवरून आदित्य ठाकरेंची सरकारवर टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com