गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी
मुंबई: मुंबईत पावसाला सुरूवात होण्यापूर्वीच कोस्टल रोडला गळती सुरू झालीय. दोन महिन्यांपूर्वीच कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेत उघडण्यात आला होता. अवघ्या दोन महिन्यात कोस्टल रोडची ही अवस्था झालीय, त्यावरून आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारला धारेवर धरलंय.
मविआचे सरकार कायम राहिले असते तर, मुंबई कोस्टल रोड डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्णपणे तयार झालेला असता. तसेच नागरिकांसाठी खुला झाला असता. पण भ्रष्ट राजवटीने आमचं सरकार पाडल्यानंतर त्या कामाचा वेग मुद्दाम कमी केला आणि खर्च वाढवण्याचं काम केल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. कोस्टल रोड गळतीवरून टीका करताना आदित्य ठाकरे म्हणाले, फेब्रुवारीमध्ये अनेकवेळा उद्धाटनाच्या तारखा बदलत राहिल्या, त्यावेळेस मी ते निदर्शनासही आणले होते. उद्धघाटन फक्त एका लेनसाठी सुरू होते.
परंतु शेवटी आम्ही केलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी निवडणुकीपूर्वी घाईघाईत १ लेन उघडण्यात आल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केलीय. कोस्टल रोड गळती प्रकरणावरुन आदित्य ठाकरेंनी बीएमसीला प्रश्न केलाय. संपूर्ण कोस्टल रोड सुरू करण्यासाठी नवनवीन टाईमलाइन देण्यात येत आहे. आधी मार्च, नंतर एप्रिल, नंतर मे पर्यंत संपूर्ण रस्ता खुला केला जाईल. आता जवळपास जून आलाय तरीही कोस्टल रोड सुरू झाला नाहीये. नागरिकांना कोस्टल रोड उघडण्याच्या अंतिम तारखेबद्दल अधिकृत अपडेट देईल का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी केलाय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.