Pune Crime: पुणे विमानतळावर ८.७१ कोटी रुपयांचा गांजा जप्त, चॉकलेट बॉक्समधून व्हायची तस्करी

Hydroponic Ganja Smuggling at Pune Airport : पुणे विमानतळावर एअर इंटेलिजेंस युनिटच्या अधिकाऱ्यांनी ₹८.७१ कोटी किमतीचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. बँकॉकहून चॉकलेट बॉक्समध्ये लपवून गांजाची तस्करी करण्यात येत होती. या प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
Hydroponic Ganja  Smuggling at Pune Airport :
Hydroponic marijuana worth Rs 8.71 crore concealed in a chocolate box seized at Pune airport.saam tv
Published On
Summary
  • पुणे विमानतळावर ८.७१ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त.

  • बँकॉक ते पुणे विमानातून ड्रग्ज तस्करीचा प्रयत्न.

  • चॉकलेट बॉक्समध्ये लपवून गांजा आणल्याचा संशय.

पुणे विमानतळावर एअर इंटेलिजन्स युनिटने या वर्षातील सर्वात मोठी कारवाई केली आहे. पुणे विमानतळावर तब्बल ८.७१ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला आहे. बँकॉकवरून पुण्यात आलेल्या विमानातून गांजाची तस्करी केली जात होती. या तस्करी प्रकरणी एअर इंटेलिजन्स युनिटने ५ जणांना अटक केली आहे.

Hydroponic Ganja  Smuggling at Pune Airport :
Mumbai : मुंबईत क्रिप्टो स्कीमचा भंडाफोड; तब्बल ६.५० कोटी लुबाडले, मास्टरमाइंडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, ४ प्रवासी हे बँकॉक ते पुणे असा विमान प्रवास करून पुणे विमानतळावर उतरले होते. तर एक व्यक्ती या चौघांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. ४ जणांच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला. ते सर्व जणं झारखंड या राज्यातील नागरिक आहेत, तर जो व्यक्ती त्यांना घेण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता तो रत्नागिरी जिल्ह्याचा असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Hydroponic Ganja  Smuggling at Pune Airport :
Pune : पुण्यात बड्या अधिकाऱ्याने घेतली २लाखांची लाच; पोलीस दलात खळबळ

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकॉकला गेलेल्या या चार जणांना नोकरीचे आमिष दाखवण्यात आले होते. तिथे गेल्यावर त्यांना तुम्ही संधी गमावली असून तुम्हाला आता नोकरी देता येणार नाही, असं सांगण्यात आलं. परतीच्या वेळी प्रत्येकाला एक चॉकलेटचा डबा देण्यात आला ज्यामध्ये गांजा लपवून ठेवण्यात आला. दरम्यान एअर इंटेलिजन्स युनिटकडून या प्रकरणाचा सगळ्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

११ फेब्रुवारी रोजीही गांजाची तस्करी करणाऱ्यांना अटक करण्यात आली होती. पुणे विमानतळावर ५.४ करोड रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला होता. त्यावेळी सुद्धा अटक करण्यात आलेला आरोपी हा बँकॉक वरून पुण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com