Kargil Vijay Diwas : कारगिलचा शेरशाह कॅप्टन विक्रम बत्रा यांच्याबाबत 'या' गोष्टी माहित असायलाच हव्यात!

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

कारगिलची लढाई १९९९ मध्ये झाली. या लढाईत ७ जुलै १९९९ ला कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले. देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या या वीराचे वय होते फक्त २४ वर्षे.

Captain Vikram Batra | Saam TV

शिक्षकाच्या घरात जन्म : पालमपूरचे निवासी शिक्षक जी.एल. बत्रा आणि त्यांची पत्नी कमलकांता बत्रा यांच्या घरात ९ सप्टेंबर १९७४ रोजी दोन मुलींनंतर दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. कमलकांता यांची 'श्रीरामचरितमानस'वर श्रद्धा होती म्हणून त्या मुलांना लव आणि कुश म्हणायच्या. लव म्हणजे विक्रम आणि कुश म्हणजे विशाल.

Captain Vikram Batra | Saam TV

सैनिकी शिक्षण : विक्रम बत्रा यांनी सैनिकी शिक्षणासाठी १९९६ मध्ये अलाहाबाद येथून सीडीएस परीक्षा दिली. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या अव्वल ३५ जणांमध्ये विक्रम बत्रा यांचा समावेश होता.

Captain Vikram Batra | Saam TV

सोपोरमध्ये नियुक्ती : डिसेंबर १९९७ मध्ये प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विक्रम बत्रा यांची नियुक्ती ६ डिसेंबर १९९७ रोजी जम्मूतील तेराव्या जम्मू काश्मीर रायफल्समध्ये लेफ्टनंट पदावर झाली.

Captain Vikram Batra | Saam TV

घरी नक्की येणार : मार्च १९९९ मध्ये होळीसाठी सुटीवर आलेले विक्रम बत्रा त्यांची होणारी पत्नी डिंपल चीमा हिच्याशी गप्पा मारत होते. गप्पा मारताना बत्रा म्हणाले काहीही झाले तरी मी घरी नक्की येणार. तिरंगा फडकावून येणार किंवा तिरंग्यात लपेटून येणार पण घरी नक्की येणार.

Captain Vikram Batra | Saam TV

वीरमरण : पॉइंट ४८७५ साठी शिखर माथ्यावर झालेल्या लढाईत पाकिस्तानच्या सैनिकांनी झाडलेली एक गोळी कॅप्टन बत्रा यांच्या डोक्यात घुसली. याच गोळीने वेध घेतला आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांना वीरमरण आले.

Captain Vikram Batra | Saam TV

ये दिल मांगे मोअर : पॉइंट ५१४० जिंकल्यानंतर कॅप्टन विक्रम बत्रा यांना वरिष्ठांना रेडिओ संदेश पाठवाताना 'ये दिल मांगे मोअर' अर्थात आणखी कठीण मोहीम द्या ती पण यशस्वी करू असे विश्वासाने सांगितले होते. हाच तो संदेश जो मीडियाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचला आणि पराक्रमी कॅप्टन विक्रम बत्रा यांचा संपूर्ण देशाने गौरव केला.

Captain Vikram Batra | Saam TV

या हल्ल्या दरम्यान भारताचा एक सैनिक जखमी झाला. या जखमी सैनिकाला तातडीने सुरक्षित ठिकाणी नेता यावे म्हणून कॅप्टन विक्रम बत्रा मशीनगनच्या एकदम समोर आले. मशीनगनचा सगळा मारा त्यांनी स्वतःवर झेलला आणि अखेर मशीनगनद्वारे सुरू असलेली भारतविरोधी कारवाई थांबविली.

Captain Vikram Batra | Saam TV

कारगिलचा शेरशहा : रेडिओवरून वरिष्ठांशी सांकेतिक भाषेत संवाद साधताना कॅप्टन विक्रम बत्रा स्वतःची ओळख शेरशाह अशीच देतील हा निर्णय वरिष्ठ पातळीवर झाला होता. या इतिहासाला सिनेमाच्या माध्यमातून साकारताना सिनेमाचे नाव शेरशाह असे करण्याचा निर्णय निर्मात्याने घेतला. आजही कारगिलचा शेर म्हणून कॅप्टन विक्रम बत्रा अर्थात शेरशाह यांचा गौरवाने उल्लेख होतो.

Captain Vikram Batra | Saam TV

कॅप्टन विक्रम बत्रा यांना त्यांच्या अतुलनीय शौर्यासाठी मरणोत्तर परवीर चक्र देण्यात आले. त्यांच्या शौर्याचा गौरव करण्यात आला. त्यांच्या आयुष्यावर शेरशहा हा बायोपिकही बनवण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Captain Vikram Batra | Saam TV