ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात हिल स्टेशनला फिरायला जाणे म्हणजे एक आल्हाददायक अनुभव...
मुंबईजवळील शांततापूर्ण 'या' पर्यटन स्थळांना आवर्जून भेट द्या आणि निसर्गाच्या सानिध्यात रहा.
आंबोली हे मुंबईजवळील एक प्राचीन हिल स्टेशन आहे. हिरवार निसर्ग आणि खळखळणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक या ठिकाणाला भेट देतात.
पन्हाळा हे पर्यटकांचे ऐतिहासिक आकर्षण आहे. मुंबईजवळील हे कमी गर्दीचे हिल स्टेशन आहे.
माथेरान हे मुंबईजवळील शांत आणि निसर्गरम्य ठिकाण आहे. तसेच हे एक पॉकेट फ्रेंडली हिल स्टेशन देखील आहे.
जव्हार हे धबधब्यांचे आकर्षण आहे. येथे आदिवासी कला पाहायला मिळते.
हिरव्यागार निसर्गाचा उत्तम नमुना म्हणजे इगतपुरी. निसर्गाच्या सानिध्यात मेडिटेशन करण्याचा आनंद घेण्यासाठी लोक येथे गर्दी करतात.
चिखलदरा हे वन्यप्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच येथे कॉफीचे मळे देखील पाहायला मिळतात.
दुर्शेत हे साहसी क्रियाकलापांसाठी ओळखले जाते. निसर्गप्रेमींसाठी हे सर्वोत्तम हिल स्टेशन आहे.