Sakshi Sunil Jadhav
गेल्या काही दिवसांपासून अकोल्यातले तापमान थेट 40 अंशांच्या पुढे गेले आहे. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील गोष्टी तुम्ही या दिवसात फॉलो केल्या पाहिजेत.
अकोल्यातील तापमान गेल्या पाच दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे.
3 मार्च - 38.6°C तर 8 मार्च - 40.9°C आणि 9 मार्च - 40.4°C इतके तापमान वाढत चालले आहे.
तहान लागली नसली तरीही दिवसभरात भरपूर पाणी पिण्याचा सल्ला प्रशासनाने दिला आहे.
उन्हाळ्यात हलकी, पातळ आणि सूती कपडे वापरणे आरोग्यासाठी योग्य ठरेल.
उन्हात बाहेर पडताना गॉगल्स, टोपी, छत्री आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा.
अशक्तपणा, चक्कर, डोकेदुखी किंवा जास्त घाम येणं ही उष्माघाताची चिन्हे असू शकतात. अशी लक्षणं दिसत असतील तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो उन्हात बाहेर जाणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
लहान मुलं किंवा पाळीव प्राणी बंद वाहनात ठेवू नयेत तसेच त्यांना सावलीत व पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे.