Newborn Baby: पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहात; मग 'या' चुका चुकूनही करू नका

Parenting Tips For Newborn Baby: चुकांमुळे चिमुकल्या बाळाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज त्याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.
Parenting Tips For Newborn Baby
Newborn BabySaam TV
Published On

प्रत्येक जोडप्याच्या आयुष्यात एका बाळाला जन्म देणे ही फार मोठी गोष्टी असते. बाळाला जन्म दिल्यानंतर आई आणि वडील दोघांनाही आपल्या बाळाची व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. बाळाची काळजी घेणे त्याचे पालनपोषण करणे तितके सोप्पे नाही.

Parenting Tips For Newborn Baby
Parenting Tips : तुमची मुलं सतत उलट उत्तरं देतात? न रागावता करा 'ही' युक्ती, काही दिवसात होतील समजूतदार

अशात जे जोडपे पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत त्यांना लहान मुल संभाळणे फार कठीण जाते. पहिलीच वेळ असल्याने त्यांच्याकडून नकळत काही चुका देखील होतात. या चुकांमुळे चिमुकल्या बाळाच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज त्याबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

मसाज

जुन्या काळात लहान मुलांना तेलाने रगडून रगडून त्यांना मसाज दिला जात होता. आजही घरात जुन्या आजी असतील तर त्या असेच करतात. मात्र असे करणे चुक आहे. लहान मुलांची हाडे फार जास्त नाजूक असतात. त्यांना मजबूत करण्यासाठी तेलाने मसाज करणे योग्य आहे. मात्र जास्त मसाज करू नये. मसाज करताना हात एकदम हलका ठेवावा.

पाळणा

लहान बाळाला रात्री झोपताना कधीच स्वत: जवळ झोपवू नये. कारण लहान बाळ आपण झोपेत असताना त्याला धक्का लागणे किंवा त्याला कोणतीही दुखापत होण्याची शक्यता असते. त्यामुळे आपण बाळाला कायम झोळीमध्येच झोपवले पाहिजे.

ढेकर देण्यासाठी मदत

लहान बाळाचं जेवण म्हणजे दूध असतं. बाळ दूध पितं तेव्हा त्याचं पोट भरलेलं असतं. पोट भरल्यावर त्याला लगेच झोपवू नका. कारण आपण देखील जेवल्यानंतर लगेच झोपल्यावर जेवण पचत नाही. त्यामुळे तुम्ही देखील बाळाला दूध पाजल्यानंतर काही वेळ त्याला घेऊन असेच उभे रहा आणि कही फेऱ्या मारा. बाळाने ढेकर दिल्यानंतर त्याला पाळण्यात किंवा झोळीत झोपवा.

टीप : ही फक्स सामान्य माहिती आहे. साम टीव्ही या माहितीचा दावा करत नाही.

Parenting Tips For Newborn Baby
Parenting Tips: लहान मुले जेवणासाठी नाक मुरडतात? या ४ गोष्टी करा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com