बदलत्या जीवनशैलीमुळे आजकाल डायनिंग टेबलवर बसून जेवण केले जाते. ज्यामुळे पचनशक्ती कमकुवत होते. अशावेळी आपली पारंपरिक बैठक आरोग्य जपते. पूर्वी लोक जमिनीवर मांडी घालून एकत्र कुटुंबासोबत जेवण करायचे. यामुळे त्यांचे आरोग्य उत्तम राहायचे. जमिनीवर बसून खाण्याची सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते.
बसण्याची सवय
जेवण हे पूर्णब्रह्म असल्यामुळे जेवण करताना तुमचे संपूर्ण लक्ष जेवणावर असणे गरजेचे आहे. यामुळे जेवण शरीराला लागते. पोटाला आणि मनाला शांती मिळते. चांगल्या आरोग्यासाठी जमिनीवर मांडी घालून बसणे हे उत्तम व्यायाम आहे. यामुळे पाठीचा कणा सरळ होतो आणि पायांना ताकद मिळते. मांडी घालून बसल्यामुळे शरीराची लवचिकता वाढते आणि हाडे मजबूत होतात. तसेच मांसपेशी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.
वजन नियंत्रणात
मांडी घालून बसल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते. नसा शांत होऊन ताण कमी होतो. तुमच्या मनाला शांती मिळते. जमिनीवर बसून जेवल्याने पोट भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. मांडी घालून बसण्याने पोटावर ताण येतो. जे आरोग्यास चांगले आहे. उठणे आणि बसण्यामध्ये शरीराची हालचाल होते. शरीरातील ताण-थकवा दूर होतो. मांडी घालून जेवण केल्यामुळे हृदयाचे आरोग्यही उत्तम राहते.
पचन सुधारते
मांडी घालून जेवायला बसल्यामुळे पचनक्रिया सुरळीत होते. तसेच अन्न त्वरीत पचते. पोटाच्या स्नायूंना चालना मिळते. शरीराच्या मांसपेशी सक्रिय होऊन ॲसिडीटीचा धोका कमी होतो.
कौटुंबिक आनंद
नियमित कुटुंबासोबत जमिनीवर मांडी घालून जेवण केल्यास कौटुंबिक नाते सुधारते. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.
डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.