Heart Transplant: भारतीयाचं हृदय दिलं पाकिस्तानच्या तरुणीला, १९ वर्षीय आयशाला मिळालं नवं आयुष्य

Pakistani girl Heart Transplant: दिल का रिश्ता बडा ही प्यारा है... या गाण्याच्या ओळी ऐकल्याच असतील. एक भारतीय व्यक्ती आणि एका पाकिस्तानी तरूणीच्या बाबतीत असंच काहीसं म्हणावं लागेल
Pakistani girl  Heart Transplant
Heart TransplantYandex
Published On

दिल का रिश्ता बडा ही प्यारा है... या गाण्याच्या ओळी ऐकल्याच असतील. एक भारतीय व्यक्ती आणि एका पाकिस्तानी तरूणीच्या बाबतीत असंच काहीसं म्हणावं लागेल. हृदयविकारानं त्रस्त असलेल्या आणि श्वासही नीट घेऊ शकत नसलेल्या १९ वर्षीय आयेशा रशन या पाकिस्तानी तरुणीवर चेन्नईच्या रुग्णालयात हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे आणि तीही मोफत करण्यात आली आहे. चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयाच्या डॉक्टरांनी ही कमाल केलीय. एका भारतीयानं आयेशाला नवं आयुष्यच दिलं आहे. आता तिला श्वास अगदी सहजपणे घेता येतोय.

Pakistani girl  Heart Transplant
National News: भारतीय कृषी संशोधन परिषद आणि धानुका ऍग्रीटेक लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार

NDTV च्या वृत्तानुसार, पाकिस्तानातील कराचीमध्ये १९ वर्षीय तरुणी आयशा रशन ही वास्तव्यास आहे.आयशाही गेल्या अनेक काळापासून हृदयविकाराने त्रस्त होती. रशनने अनेकदा रुग्णालयात गेली आहे, त्यावेळी तिला प्रत्येक डॉक्टरांनी हृदय प्रत्यारोपण करण्यास सांगितले होते. त्यानंतर पाकिस्तानी आयशावर भारतात मोफत हृदय प्रत्यारोपण करण्यात आलं आहे. यामुळे तिला नवीन आयुष्य मिळाले आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, आयशाला हृदयविकारानंतर व्हेटिंलेटरवर ठेवले होते. तिच्या हृदयाचे 'व्हॉल्व' खराब झाले होते. त्यामुळे तिला हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. तसेच आयशाच्या हृदयाच्या व्हॉल्व'मध्ये गळती झाली होती. त्यामुळे प्रत्यारोपणाची खूप गरज होती. यामुळे आयशाला चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयात आणले. या रुग्णालयात तिच्या यशस्वी हृदय प्रत्यारोप करण्यात आले. डॉक्टरांनी यशस्वीरिच्या हृदय प्रत्यारोपण केल्याने आयशाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाच्या डॉक्टरांचे आभार मानले आहेत.

आयशाच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. ती लवकरच कराचीला परतणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. आयशाच्या प्रत्यारोपणासाठी मदत केलेल्या चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर आणि मेडिकल ट्रस्टचे तिच्या कुटुंबियांनी आभार मानले आहेत.

आयशाच्या हृदय प्रत्यारोपणाच्या संपूर्ण शस्त्रक्रियेचा साधारण खर्च ३५लाख रुपये येणार होतो, जो तिच्या कुटुंबियांना परवडणार नव्हता. मात्र सर्व खर्च चेन्नईच्या एमजीएम हेल्थकेअर रुग्णालयाने केला आहे.

नशीबवान आयशा

हृदय प्रत्यारोपण संस्थेचे संचालक डॉ. के. आर. बालकृष्णन यांनी सांगितले की, आयशा ही नशीबवान आहे. तिच्यासाठी खूप कमी वेळात हृदयाची व्यवस्था करण्यात आली. या प्रत्यारोपणासाठी हृदय दिल्लीतून चेन्नईला आणल्याची माहिती दिली. तसेच भारतात प्रत्यारोपण धोरणात सुधारणा करण्याची विनंती डॉक्टरांनी सरकारला केली आहे. अनेकदा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेवर मोठ्या प्रमाणात खर्च येतो. त्यामुळे दान केलेले अवयव वापरले जात नाहीत, असे त्यांनी म्हटले.

Pakistani girl  Heart Transplant
National Deworming Day : मुलांमधील अशक्तपणा, थकवा दूर करण्यासाठी जंतनाशक औषधे फायदेशीर, डॉक्टरांनी दिला सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com