अमेरिका ते चेन्नई, २६ तास प्रवास अन् १.०६ कोटी खर्च; हर्ट पेशंट महिला एअर अॅम्ब्युलन्सनं रुग्णालयात

मूळची बेंगळुरूतील एक ६७ वर्षीय महिला हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेहून चेन्नईत पोहोचली आहे.
Woman Patient Came Chennai Travel in 26 Hours From America
Woman Patient Came Chennai Travel in 26 Hours From AmericaSAAM TV
Published On

बेंगळुरू: मूळची बेंगळुरूतील एक ६७ वर्षीय महिला हृदयावरील शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेहून चेन्नईत पोहोचली आहे. यापूर्वी या महिलेवर अमेरिकेत उपचार सुरू होते. मात्र, आणखी चांगले उपचार मिळावेत यासाठी तिला परत मायदेशात आणण्यात आले आहे. या वृद्ध महिलेला अमेरिकेहून चेन्नईत आणण्यासाठी दोन एअर अॅम्ब्युलन्सचा वापर करण्यात आला. त्याद्वारे महिलेला अमेरिकेच्या पोर्टलँडहून चेन्नईत येण्यासाठी २६ तास लागले. या दोन एअर अॅम्ब्युलन्ससाठी तिने १.३३ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच जवळपास १.०६ कोटी रुपये खर्च केले आहेत.

Woman Patient Came Chennai Travel in 26 Hours From America
२०० कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण, देशव्यापी लसीकरणाचा विक्रम; WHO'ने केले कौतुक

बेंगळुरूच्या (Bengaluru) इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या या महिलेला आइसलँड आणि इटली असे दोन एअर अॅम्ब्युलन्समधून चेन्नईला (Chennai) आणण्यात आले. २६ तासांची ही फ्लाइट आतापर्यंतची सर्वाधिक वेळेतील एअरोमेडिकल फ्लाइट्सपैकी एक आहे. ही महिला रुग्ण आपल्या मुलांसह अमेरिकेच्या ओरेगॉनमध्ये काही वर्षांपासून राहत होती. या कालावधीत ही महिला हृदयविकारानं (Heart Patient) त्रस्त असल्याचे निदान झाले होते.

Woman Patient Came Chennai Travel in 26 Hours From America
Nashik : घशात अडकलेले नाणे बाहेर काढले; १२ वर्षीय मुलीला डॉक्टरांनी दिले जीवनदान

६७ वर्षीय या महिलेला रविवारी सकाळी ओरेगॉनच्या पोर्टलँडमधील लीगेसी गुड समॅरिटन मेडिकल सेंटरमधून आधी पोर्टलँड इंटरनॅशनल एअरपोर्टला आणण्यात आले. त्यानंतर तिथे तिला एका खासगी विमानात ठेवण्यात आले. ते खासगी विमान एअर अॅम्ब्युलन्समध्ये रुपांतरीत करण्यात आले. त्यामध्ये आयसीयू युनिट देखील आहे. या एअर अॅम्ब्युलन्समध्ये तीन डॉक्टर आणि दोन पॅरामेडिकल कर्मचारी होते. त्यांच्या देखरेखीखाली महिला रुग्णाला ठेवण्यात आले. त्यानंतर साडेसात तासांनी आइसलँडच्या रेजेविक एअरपोर्टला नेण्यात आले. तेथे एअर अॅम्ब्युलन्समध्ये इंधन भरण्यात आले.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, या महिला रुग्णाला विमानातून ६ तासांच्या उड्डाणानंतर इस्तंबूलला नेण्यात आले. तेथे वैद्यकीय पथक आणि विमानातील क्रू मेंबर बदलण्यात आले. तेथे एअर अॅम्ब्युलन्सही बदलण्यात आली. त्यानंतर चार तासांनी दियारबाकिर नेण्यात आले. तेथून एअर अॅम्ब्युलन्सने थेट चेन्नईत सोमवारी रात्री उशिरा दोन वाजताच्या सुमारास आणण्यात आले. आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना शहरातील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. एअर अॅम्ब्युलन्सची सेवा देणाऱ्या कंपनीच्या संस्थापकांनी सांगितले की, अमेरिकेत या उपचारावर होणारा खर्च हा अॅम्बुलन्सच्या या खर्चापैक्षा कैक पटीने अधिक होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com