२०० कोटी कोरोना लसींचा टप्पा पूर्ण, देशव्यापी लसीकरणाचा विक्रम; WHO'ने केले कौतुक

भारतातही लसीकरणास झपाट्याने सुरूवात झाली.
corona vaccination
corona vaccinationSaam Tv
Published On

नवी दिल्ली: जगभरात गेल्या दोन वर्षात कोरोनाने (Corona) मोठे थैमान घातले होते. तब्बल एक वर्षानंतर कोरोनाविरोधातील लढाईसाठी लस आली. भारतातही लसीकरणास झपाट्याने सुरूवात झाली. देशाने आता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेत एक महत्त्वाची कामगिरी केली आहे. रविवारी भारतात दिलेल्या लसीची संख्या २०० कोटींच्या पुढे गेली. याचे जगभरातून कौतुक केले जात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने कौतुक केले आहे.

कोरोना महामारीचा संसर्ग कमी करण्यासाठी लस ही एकमेव आहे याचा पुरावा भारत आहे, अस डब्लूएचओने म्हटले आहे. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी या कामगिरीचे वर्णन अभिमानाचा क्षण असल्याचे म्हटले आहे.

corona vaccination
शिंदे-फडणवीस सरकारचा पवारांना दणका; स्थगिती उठवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

गृहमंत्री अमित शाह यांनीही लसीकरणाचे कौतुक केले आहे. 'अवघ्या दीड वर्षात २०० कोटी लसीकरण. यावरून पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील न्यू इंडियाची इच्छाशक्ती आणि ताकद दिसून येते. मी आमचे शास्त्रज्ञ, डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि लसीकरण मोहिमेत सहभागी असलेल्या प्रत्येकाला सलाम करतो.' असं ट्विट अमित शाह यांनी केले आहे.

'जीवाची पर्वा न करता सतत रुग्णांवर उपचार करणाऱ्या देशातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम.' असं आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

corona vaccination
मोठी दुर्घटना! पंचखरो धरणात बोट बुडाली; एकाच कुटुंबातील ८ जणांना जलसमाधी

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, ९८ टक्के वयस्कर नागरिकांना लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर ९० टक्के लोकांना पूर्णपणे लसीकरण करण्यात आले आहे. या यशावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोग्य विभागाचे कोतुक केले आहे. 'भारताने पुन्हा इतिहास रचला आहे. भारतातील लोकांनी विज्ञानावर विश्वास दाखवला आहे, देशातील डॉक्टर, परिचारिका, आघाडीचे कर्मचारी आणि वैज्ञानिकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. “मी त्यांच्या कामाचे कौतुक करतो.

भारताने पुन्हा इतिहास रचला. लसीच्या २०० कोटी डोसचा विशेष आकडा पार केल्याबद्दल सर्व भारतीयांचे अभिनंदन. भारताच्या लसीकरण मोहिमेचा विस्तार करण्यासाठी ज्यांनी अतुलनीय योगदान दिले त्यांचा अभिमान आहे. यामुळे कोविड-19 विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ मिळाले आहे, असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com