कोडरमा : राज्यासह देशात सध्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने रस्ते जलमय झाले असून नदी नाल्यांना पूर आलाय. अशातच झारखंडमधून (Jharkhand) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात पर्यटकांनी भरलेली बोट (Boat) बुडाली आहे. माहितीनुसार, पंचखरो धरणात ही बोट बुडाली आहे. या बोटमधून १० पर्यटक प्रवास करत होते. (Jharkhand Boat Capsizing Latest News)
दरम्यान, बोट बुडाल्याची माहिती मिळताच घटनास्थळी मदत आणि बचावकार्य मोठ्या वेगाने सुरू करण्यात आलं आहे. बोटीमधून एकूण १० पर्यटक प्रवास करत होते. यातील तब्बल ८ पर्यटक हे अजूनही बेपत्ता असल्याची माहिती आहे. बुडालेल्यांपैकी एकाला वाचवण्यात यश आलंय. तर ४ लहान मुलं दोन महिला आणि दोन पुरूष अजूनही बेपत्ता आहे.
कोरडमा जिल्ह्यातील मरकच्चो बॉर्डरजवळ पंचखरो जलायश आहे. सध्या पर्यटनाचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला येत असतात. त्यातच रविवार असल्याने आज येथे पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जलाशयात बोटींग सुरू असताना अचानक बोट उलटली. (Jharkhand Latest News)
दरम्यान, बोट उलटताच, सर्व पर्यटक पाण्यात पडले. यातील दोन जणांना वाचवण्यात यश आलं तर ८ पर्यटक अजूनही बेपत्ता आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बुडालेले ८ पर्यटक हे गिरिडीह जिल्ह्यातील राजधनवार गावातील असल्याची माहिती आहे. इतकंच नाही तर, बोटीवर बसलेले सर्व जण एकाच कुटुंबातील असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.