तबरेज शेख
नाशिक : खेळता-खेळता १२ वर्षीय मुलीने दहा रुपयांचे नाणे (Coin) गिळले. मात्र तिला वेळीच नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर येथील कान, नाक आणि घसा तज्ज्ञांनी तत्काळ दुर्बिणीद्वारे शस्रक्रिया करुन तिच्या घशातील नाणे बाहेर काढले. ज्योती प्रकाश गवळी असे या मुलीचे नाव आहे. (Doctors Withdraw the coin stuck in the throat; Doctors give life to 12-year-old girl)
दोन दिवसांपूर्वी खेळतांना १० रुपयांचे नाणे तिच्या घश्यात अडकले होते. त्यामुळे तिला जेवतांना आणि श्वास घेताना त्रास जाणवू लागला. ज्योतीला नाशिक जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल करुन एक्स-रे तपासणी करण्यात आली. त्यानंतर पूर्ण भुल देऊन दुर्बिणीतून शस्त्रक्रिया करून हे दहा रुपयांचे नाणे यशस्वीपणे बाहेर काढण्यात डॉक्टरांना यश आले.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.