National Deworming Day : मुलांमधील अशक्तपणा, थकवा दूर करण्यासाठी जंतनाशक औषधे फायदेशीर, डॉक्टरांनी दिला सल्ला

Kids Health Tips : लहान मुलांमध्ये जंत होणे हे अतिशय सामान्य बाब आहे. ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही, मात्र त्याचे परिणाम मुलांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरतात. दीर्घकाळ मुलांच्या शरीरात जंत राहील्यास त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांना 6 ते 12 महिन्यातून एकदा जंतनाशक औषध दिले जावे.
Kids Health Tips
Kids Health TipsSaam Tv
Published On

Benefits of Deworming Medicine for Kids:

लहान मुलांमध्ये जंत होणे हे अतिशय सामान्य बाब आहे. ही गोष्ट चटकन लक्षात येत नाही, मात्र त्याचे परिणाम मुलांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरतात. दीर्घकाळ मुलांच्या शरीरात जंत राहील्यास त्यांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागते. मुलांना 6 ते 12 महिन्यातून एकदा जंतनाशक औषध दिले जावे.

1-19 वयोगटातील मुलांमध्ये जंतनाशक हे त्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी (Health) फायदेशीर ठरते. मुलांना नियमित जंतनाशक औषध देऊन, या संसर्गास रोखता येणे शक्य आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 20% पेक्षा जास्त प्रादुर्भाव असलेल्या भागात वार्षिक जंतनाशक आणि 50% पेक्षा जास्त प्रसार असलेल्या भागात द्विवार्षिक जंतनाशकाची शिफारस केली जाते.

अस्वच्छतेमुळे मुलांच्या आतड्यात जंतांची वाढ होऊ शकते. त्यांना मातीतून कृमी मिळण्याची प्रवृत्ती असते. जागतिक आरोग्य संघटनेनच्या (WHO) मते, भारतातील सुमारे 220 दशलक्ष मुलांना (1 ते 14 वर्षे) एसटीएच(STH) संसर्गाचा धोका आहे. महाराष्ट्रात याचे प्रमाण 20% - 50% इतके आहे . जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्सा माहितीनुसार 870 दशलक्ष मुलांना (जगातील निम्म्या मुलांना) परजीवी जंत संसर्गाचा धोका आहे. जंतनाशकामध्ये राउंड वर्म्स, फ्लूक्स आणि टेपवर्म्स सारख्या परजीवी नष्ट करण्यासाठी अँटीहेल्मिंथिक औषधांचा समावेश केला जातो.

Kids Health Tips
Child Care Tips : चिमुकल्यांना खाऊ घाला हे ५ पदार्थ, इम्युनिटी होईल स्ट्राँग; अनेक आजारांपासून राहातील दूर

एस्केरिस लुम्ब्रिकोइड्स (राउंडवर्म), ट्रायच्युरिस ट्रायच्युरा (व्हीपवर्म), आणि अँसायलोस्टोमा ड्युओडेनेल किंवा नेकेटर अमेरिकनस (हुकवर्म्स) जे मानवांमध्ये सर्वाधीक प्रमाणात आढळून येणारे परजीवी आहेत, यासह निमॅटोड संसर्गामुळे मातीतून संक्रमित होणारा हेल्मिंथियासचा परिणाम होतो.

आतड्यातील जंत हे अशक्तपणा (कमी हिमोग्लोबिन) कारणीभूत ठरते. कारण यात मुलांच्या शरीरातून रक्त कमी होते. अशक्तपणामुळे मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, त्यांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि शारीरिक तग धरण्याची क्षमता कमी होते. वर्म्समुळे दीर्घकाळ रक्त कमी झाल्यामुळे लोहाची कमतरता निर्माण होते.

Kids Health Tips
Parenting Tips : पालकांनो, मुलांचा स्क्रीन टाइम वाढलाय? कसे कळेल? या गोष्टी लक्षात ठेवा

लोह शरीरात मेंदूचे कार्य, रक्तातील ऑक्सिजनचे वहन आणि स्नायूंचे कार्य यासह अनेक महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. जंताने प्रभावित मुलांना थकवा,अशक्तपणा आणि एकाग्रता कमी होणे अशी लक्षणे (Symptoms) आढळून येऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेवर परिणाम होतो.

यासाठी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली औषधांचे (Medicine) सेवन करणे गरजेचे आहे. सामान्यतः लिहून दिलेल्या औषधांमध्ये अल्बेंडाझोल किंवा मेबेन्डाझोल यांचा समावेश होतो, जे कृमींना ग्लुकोज शोषून घेण्यापासून रोखतात, ज्यामुळे त्यांची उर्जा कमी होते आणि त्या कृमी मृत पावत असल्याची माहिती डॉ. तुषार पारीख(मदरहूड हॉस्पिटल्स पुणे येथील वरिष्ठ सल्लागार बालरोगतज्ज्ञ आणि निओनॅटोलॉजिस्ट) म्हणाले.

Kids Health Tips
Kids Health Tips : लहान मुलांसाठी फिडींग स्पून खरेदी करण्यापूर्वी 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा!

याकरिता वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) प्रतिबंधात्मक थेरपी वापरण्याचा सल्ला देते, विशेषत: जंतनाशक अल्बेंडाझोल (400 mg) किंवा मेबेंडाझोल (500 mg) चा वार्षिक किंवा द्विवार्षिक डोस प्रशासनाद्वारे दिला जातो. या हस्तक्षेपाची शिफारस 12-23 महिने वयोगटातील लहान मुले, 1-4 वर्षे वयोगटातील प्रीस्कूल मुले आणि 5-12 वर्षे वयोगटातील शालेय मुले (विशिष्ट भागात 14 वर्षांपर्यंत) ज्या प्रदेशात कोणत्याही मातीचा प्रादुर्भाव आहे अशा प्रदेशात राहणाऱ्यांसाठी केली जाते.

मुलांमध्ये संक्रमित संसर्ग 20% किंवा त्याहून अधिक आहे. मातीतून पसरणाऱ्या हेल्मिंथ संसर्गाचे ओझे कमी करणे हा यामागचा उद्देश आहे. ५०% पेक्षा जास्त प्रभावित भागात, द्विवार्षिक डोस देण्यास प्राधान्य दिले जाते. 24 महिन्यांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी अल्बेंडाझोल (200 मिग्रॅ) च्या अर्ध्या डोसची शिफारस केली जाते. आम्ही ५ वर्षापर्यंतच्या मुलांसाठी वर्षातून दोनदा डोस देण्याता सल्ला देतो जिथे एसटीएचचा प्रादुर्भाव अधिक असतो. त्यानंतर ५ ते १२-१४ वयोगटातील मुलांना वार्षिक डोस दिला जातो असेही डॉ. तुषार पारीख यांनी स्पष्ट केले.

10 फेब्रुवारी रोजी संपूर्ण भारतात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा केला जातो. शाळा आणि अंगणवाडी सेविका अशा विविध माध्यमांद्वारे मोफत अल्बेंडाझोलचे वाटप करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे.मुलांमध्ये जंतनाशक ही काळाची गरज आहे कारण जंतांमुळे मुलांच्या संपुर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. आतड्यांतील कृमी मुलाच्या पचनसंस्थेवर परिणाम करतात, ज्यामुळे कुपोषण आणि वाढ खुंटणे अशी लक्षणे दिसून येतात.

परजीवी अशक्तपणा आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात, ज्यामुळे मुले इतर आजारांना बळी पडतात. मुलांना जंतनाशक औषध देऊन आरोग्यासंबंधीत धोके लक्षणीयरीत्या कमी करता येऊ शकतात आणि त्यांचे संपूर्ण आरोग्य सुधारता येऊ शकते. आतड्यांतील जंतांमुळे शारीरीक कमकुवतपणा येऊ शकतो आणि आजारपणामुळे मुलांना शाळेत हजेरी लावणे शक्य होत नाही. त्यामुळे मुलांमधील जंतनाशकाला प्राधान्य देणे हे त्यांच्या भविष्यातील विकासासाठी फायदेशीर ठरते असे डॉ पारीख यांनी स्पष्ट केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com