Kids Health Tips : लहान मुलांसाठी फिडींग स्पून खरेदी करण्यापूर्वी 'या' काही गोष्टी लक्षात ठेवा!

Baby Care : मुलांच्या खेळण्यापासून ते खाण्यापिण्याच्या संबंधित सर्व गोष्टीची काळजी पालक घेतात.
Kids Health Tips
Kids Health TipsSaam Tv
Published On

Kids Health Tips : लहान मूल अतिशय नाजूक असते त्यामुळे पालक त्याची काळजी घेण्यासाठी कोणतही कसर सोडत नाही. मुलांच्या खेळण्यापासून ते खाण्यापिण्याच्या संबंधित सर्व गोष्टीची काळजी पालक घेतात. जेव्हा बाळ स्तनपानाव्यतिरिक्त इतर अन्नपदार्थ आणि पेय सुरू करते त्यावेळेस पालकांची काळजी अजून वाढते.

मुलांच्या हेल्दीफूड पासून ते खाण्यापिण्याच्या स्वच्छतेकडे खूप लक्ष द्यावे लागते. अशा वेळेस मुलांसाठी बेबी फीडिंग स्पून घ्यावे असे पालकांना वाटते पण तो स्पून खरेदी करताना एवढा विचार करत नाही.

Kids Health Tips
Baby Care : लहान मुलांना आंघोळ घालताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा ! अन्यथा, बाळ पडेल आजारी

बेबी फिडींग स्पून बाजारात जो उपलब्ध आहे ते घेऊन येतात.पण ते खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे असते त्यामुळे बाळाचे आरोग्य (Health) चांगले राहते. म्हणून बेबी फीडिंग स्पून घेण्यापूर्वी या काही गोष्टी लक्षात असले पाहिजे.

1.केमिकल फ्री

मुलांच्या संगोपन करण्यासाठी पालक खूप काळजी घेत असतात. त्याचे आरोग्य सुरक्षित रहावे म्हणून अन्नपदार्थ (Food) चारण्यासाठी बेबी फीडिंग स्पून खरेदी करतात.पण ते स्पून खरेदी करताना केमिकल फ्री आहे की नाही हे चेक करणे गरजेचे असते. बाजारात उपलब्ध असलेल्या बऱ्याच बेबी फिटिग स्पूनमध्ये केमिकलचा वापर केला जातो ज्यामुळे ते खरेदी केल्यास बाळाच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Kids Health Tips
Wet Wipes for Baby : नवजात बाळासाठी वेट वाइप्स वापरणे आरोग्यदायी आहे का? जाणून घ्या डॉक्टरांची मत

2. सॉफ्टनेस

बाळ नाजूक असल्याने कठीण स्पूनमुळे त्याला दुखापत होऊ शकते.अशा वेळेस बेबी फीडिंग स्पून खरेदी करताना सॉफ्टनेस तपासूनच बाळासाठी खरेदी करावे. त्यामुळे बाळाच्या नाजूक हिरड्यांना त्रास होणार नाही. बऱ्याच वेळ मूल (Kids) स्पूनसोबत खेळतात त्यामुळे जर स्पून सॉफ्ट असेल तर बाळाला स्पून सोबत खेळताना आनंद होईल.

3. आकार

मोठ्या आकाराच्या स्पून मुळे मुलांना भरवताना अडथळे येतात. त्यामुळे बेबी फीडिंग स्पून खरेदी करताना त्याचा आकार लक्षात घेणे आवश्यक असते. मुलांसाठी नेहमी लहान आकाराचे स्पून खरेदी करावे. मोठ्या आकाराचे स्पून बाळासाठी कठीण असू शकते.

4. ग्रिप

बाळ जेवताना कधी खेळते तर कधी रडते म्हणून अशा परिस्थितीत बाळाला अन्नपदार्थ भरवण्यासाठी स्पूनची पकड व्यवस्थित असणे आवश्यक आहे. स्पून खरेदी करताना नेहमी मोठे हँडल असेल असे घ्या. ज्यामुळे लहान मुलांना दूध पाजण्यात किंवा अन्नपदार्थ चारण्यास अडथळे येणार नाही.

Kids Health Tips
How To Clean a Baby's Tongue | बाळाची जीभ कशी स्वच्छ करावी?

5. डिझाईन

लहान मुलांनसाठी फीडिंग स्पून खरेदी करताना डिझाईनचा विचार करणे आवश्यक आहे. बेबी फिडिंग स्पून वेगवेगळा डिझाईन मध्ये आणि टॉयच्या स्वरूपात उपलब्ध असतात. स्पून खरेदी करताना रंग विचारात घ्या कारण लहान मुलाना रंगीबेरंगी वस्तू खूप आवडतात जर कलरफुल स्पून असेल मूल जेवणाचा आनंद घेईल आणि आवडीने न रडता जेवण करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com