Onion Health Benefits : पावसात नियमित करा कांद्याच्या रसाचे सेवन, सर्दी खोकल्यापासून लगेच मिळेल सुटका

Onion Juice In Monsoon : जेवणाची चव वाढवणारा कांदा आरोग्यासाठी गुणकारी आहे. पावसात होणाऱ्या साथीच्या आजारांसाठी एक कप कांद्याचा रस आरोग्यवर्धक आहे.
onion juice in monsoon
Onion Health BenefitsSAAM TV
Published On

पावसाळा अनेक आजारांना आमंत्रण देतो. शरीरात जंतू जाऊन आपले आरोग्य बिघडते. अशात जेवणात वापरला जाणारा कांदा आरोग्यासाठी बहुगुणी ठरतो. कांद्याचा रस चवीला तिखट जरी असला तर पावसात होणाऱ्या आजारांशी लढण्याची ताकद देतो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यासाठी कांद्याचा रस मदत करतो. कांद्यामध्ये अँटी-ऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल हे गुणधर्म असतात. यामुळे पावसात नियमित कांद्याच्या रसाचे सेवन करावे आणि शरीराचे होणारे नुकसान टाळा.

रक्ताभिसरण

पावसात नियमित काद्यांचा रस प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुरळीत होते. सकाळी रिकाम्या पोटी कांद्याचा रस प्यायल्याने ॲसिडीटीचा त्रास कमी होतो. कांद्यामधील मॅग्नेशियम रक्तदाब संतुलित करण्यास मदत करतात. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास दररोज कांद्याचा रस प्यावा. कांद्याच्या रसाचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी संतुलित होते.

त्वचेची सूज कमी

पावसात कांद्याच्या रसाचे सेवन केल्यास शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. कांद्यात दाहक विरोधी गुणधर्म असल्यामुळे शरीराला येणारी सूज कमी होते. हा रस रक्त शुद्ध करते.

रोग प्रतिकारशक्ती वाढते

नियमित कांद्याचा रस प्यायल्याने पावसात आजाराशी लढायला ताकद मिळते. आपली रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते. कांद्याचा रसामध्ये ओमेगा -3 फॅटी ॲसिड असते. जे स्मरणशक्ती मजबूत करण्यास मदत करते. लहान मुलांनी नियमित कांद्याच्या रसाचे सेवन केले पाहिजे.

onion juice in monsoon
Curry Leaves : कढीपत्त्याची पाने लगेच खराब होतात? मग या ट्रीक्सने स्टोर करा, एकही पान खराब होणार नाही

मासिक पाळीच्या वेदना कमी

कांद्याच्या रसाचे मासिक पाळी सुरू होण्यापूर्वी सेवन केल्यास शरीराला आराम मिळतो. पोटदुखीपासून आपले संरक्षण होते.

तोंडाचे आरोग्य उत्तम

कांदा खाल्ल्याने तोंडाला वास येतो खरा. पण कांद्याचा रस तोंड आणि दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कांद्याच्या रसामुळे हिरड्यांचे आरोग्य सुधारते, दातदुखीवर आराम मिळतो.

सर्दी-पडश्यावर आराम

पावसात सर्दी-ताप, खोकला यांचे प्रमाण वाढते. अशात कांद्याचा रस अनेक आजारांवर फायदेशीर ठरतो. कांद्याच्या रसात मध घालून प्यायल्याने सर्दी-ताप, खोकला लवकर बरा होतो. कांद्याच्या रसाची वाफ सर्दीवर रामबाण उपाय आहे.

डिस्क्लेमर : ही फक्त सामान्य माहिती आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

onion juice in monsoon
फक्त गोड पदार्थ खाल्ल्यानेच नाही तर 'या' कारणांनीही वाढतो मधुमेहाचा धोका; आताच सतर्क व्हा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com