कांदा खरेदीची ईडी, सीबीआय चाैकशी व्हावी, शेतकरी संघटनेचा काेट्यावधींच्या घाेटाळ्याचा आराेप (पाहा व्हिडिओ)

bharat dighole demands ed and cbi inquiry of onion purchased in maharashtra: कांदा खरेदीत गैरप्रकार झाल्याचे नाफेडच्या अध्यक्षांनी नाशिक येथे मान्य केले हाेते. त्याची चाैकशी हाेईल असे आश्वासित केल्याचे दिघाेळेंनी नमूद केले हाेते.
bharat dighole demands ed and cbi inquiry of onion purchased in maharashtra
bharat dighole demands ed and cbi inquiry of onion purchased in maharashtraSaam Digital

नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत सुमारे 2 ते अडीच हजार काेटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आराेप शेतकरी संघटनेने केला आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे भारत दिघोळे यांनी कांदा खरेदीत बाेगसगिरी झाल्याचे म्हटले आहे. ईडी आणि सीबीआय मार्फत या संपूर्ण कांदा खरेदीची चौकशी करावी अशी मागणी दिघाेळे यांनी केली आहे.

भारत दिघोळे म्हणाल्या नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत पाच लाख मेट्रीक टन कांदा खरेदीचा निर्णय झाला हाेता. नाफेड आणि एनसीसीएफकडून थेट शेतकरी यांच्याकडून कांदा खरेदी न करता बाजार समिती यांच्या माध्यमातून केला गेला. कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे.

bharat dighole demands ed and cbi inquiry of onion purchased in maharashtra
Maharashtra Milk Price Issue: शब्द पाळा अन्यथा पायउतार व्हा, डाॅ. अजित नवलेंचे राधाकृष्ण विखे पाटलांना आवाहन; दूधदरासाठी उद्यापासून राज्यभर आंदाेलन

केंद्र सरकार सातत्याने शेतकरी विराेधी निर्णय घेत आहे. केंद्र सरकराने कांदा खरेदी घाेटाळ्याची तत्काळ चाैकशी करावी. बाेगसगिरी करुन कांदा खरेदी केलेल्या संस्थांची ईडी आणि सीबीआय चाैकशी झाली पाहिजे अशी मागणी दिघाेळेंनी केली.

Edited By : Siddharth Latkar

bharat dighole demands ed and cbi inquiry of onion purchased in maharashtra
Shani Shingnapur : भाविकांना, शनि देवाचे चौथाऱ्यावरुन दर्शन घेता येणार नाही, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com