Maharashtra Milk Price Issue: दूधदरासाठी शेतकरी उतरले रस्त्यावर, नगर जिल्ह्यात रास्ता राेकाे आंदाेलनास प्रारंभ (पाहा व्हिडिओ)

farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar : बंद पडलेली महानंदा डेअरी एनडीडीबी (मदर डेअरी) कडे उत्पादन वाढवण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. मदर डेरीने देखील या राज्यातील अधिकच्या उत्पादनाबाबत नियोजन उचलावीत अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केले आहे.
farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar
farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar Saam Digital

- सचिन बनसोडे / मंगेश कचरे

दूध दरासाठी राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. नगर जिल्ह्यातील कोल्हार घोटी राजमार्गावर आज (शुक्रवार) दूध उत्पादक शेतक-यांनी रास्ता रोको आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनात शेकडाे शेतकरी सहभागी झाले आहेत. शिव आर्मी संघटनेने देखील आक्रमक पवित्रा घेत सरकारकडे विविध मागण्या केल्या.

दुधाला किमान 40 रुपये भाव मिळावा यासह अनुदानाच्या मागणीसाठी संगमनेर तालुक्यातील चिखली या गावात शेतक-यांनी आंदोलन छेडले आहे. उद्या दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत बैठक बोलावली आहे मात्र आज त्यांच्याच अहमदनगर जिल्ह्यात दूध दरासाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले.

farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar
MSP ची वाढ तुटपुंजी, केंद्र सरकराने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं : डाॅ. अजित नवले

दरम्यान भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गुरुवारी दुधापासून तयार होणारी पावडर निर्यात करण्यास परवानगी मिळावी. निर्यात करण्यासाठी किमान पन्नास रुपये प्रति टन अनुदान सरकारने द्यावे.

गुजरात कर्नाटक या राज्यात अशा पद्धतीचा विचार विनिमय सुरू आहे. अमूलकडे मोठ्या प्रमाणात पावडर शिल्लक आहे भविष्यातील संकटे पाहता हे गरजेचे आहे. 29 तारखेला मंत्री विखे पाटील यांनी या प्रस्तावाबाबत बैठक आयोजित केली आहे. या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केल्याचे साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

farmers demands rs 40 for milk rasta roko andolan in chikhali near nagar
Shani Shingnapur : भाविकांना, शनि देवाचे चौथाऱ्यावरुन दर्शन घेता येणार नाही, जाणून घ्या कारण

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com