MSP ची वाढ तुटपुंजी, केंद्र सरकराने शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळलं : डाॅ. अजित नवले

msp hike an eyewash says dr. ajit navale : विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. महाराष्ट्रात आणि देशभरातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने आपल्या शेतकरी विरोधी धोरणाचा पुनर्विचार करावा अशी मागणी किसान सभेने केली आहे.
msp hike an eyewash central government claim misleading says dr ajit navale of kisan sabha
msp hike an eyewash central government claim misleading says dr ajit navale of kisan sabha Saam Digital
Published On

- सचिन बनसाेडे

वाढता उत्पादन खर्च व केंद्र सरकारने शेती सेवा, औजारे, निविष्ठा व उत्पादनावर लावलेले जीएसटीचे दर पाहता बुधवारी जाहीर झालेले एमएसपीचा भाव तुटपुंजा आहे. सरकारने एक प्रकारे शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे असे मत टीका किसान सभेचे डाॅ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.

msp hike an eyewash central government claim misleading says dr ajit navale of kisan sabha
PM-Kisan Samman Nidhi: शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आज २००० रुपये जमा होणार; पेरणीच्या खर्चाचं टेन्शन मिटणार

डाॅ. अजित नवले म्हणाले लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देशभरातील शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आता तरी आपल्या शेतकरी विरोधी धोरणांमध्ये बदल करेल व खरीप हंगामाचे एमएसपीचे भाव रास्त उत्पादन खर्चावर आधारित शेतकऱ्यांना परवडतील अशा पातळीवर जाहीर करेल अशी अपेक्षा होती. मात्र केंद्र सरकारने जाहीर केलेले आधार भाव पाहता ही अपेक्षा फलद्रूप झालेली नाही.

msp hike an eyewash central government claim misleading says dr ajit navale of kisan sabha
Kalyan Dombivli: 27 गावांच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या लढ्याला आले यश, मालमत्ता कर आकारणीविषयी दिली महत्वपूर्ण माहिती

डाॅ. नवले पुढं बाेलतान म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्रात कृषी मूल्य आयोगाच्या झालेल्या बैठकीमध्ये सोयाबीनला किमान 5300 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देण्याची मागणी केली होती. किसान सभेने परिषद घेऊन सोयाबीनचा उत्पादन खर्च पाहता किमान 7000 रुपये प्रति क्विंटल आधार भाव जाहीर करण्याची मागणी केलेली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत तुटपुंजी वाढ करून यावर्षी केंद्र सरकारने सोयाबीनसाठी 4892 रुपये इतकाच हमीभाव जाहीर केला आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या मागणीच्या तुलनेत सुद्धा तो 408 रुपयाने कमी आहे अशी खंत नवलेंनी व्यक्त केली.

नवले म्हणाले वाढता उत्पादन खर्च पाहता कापसाला किमान 10 हजार रुपये प्रति क्विंटल भाव शेतकऱ्यांना मिळावा असा ठराव किसान सभेने वर्धा येथे घेतलेल्या परिषदेमध्ये केलेला होता. केंद्र सरकारने या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला हमीभाव हा खूप कमी असून केवळ 7121 रुपये हमीभाव कापसासाठी जाहीर करण्यात आलेला आहे. शेतकरी व किसान सभेची मागणी आणि जाहीर करण्यात आलेला हमीभाव याच्यामध्ये 2879 रुपयांचा फरक दिसतो आहे.

वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी, तेल बिया यांचे सुद्धा उत्पादन मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात घेतलं जातं. केंद्र सरकार यामध्ये भरीव वाढ केली असल्याचा दावा करत असलं तरी प्रत्यक्षामध्ये हे शेतीमाल आधार भावाप्रमाणे खरेदी केले जात नाहीत हे वास्तव आहे.

केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हमीभावामध्ये धरण्यात आलेला उत्पादन खर्च अत्यंत कमी आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी प्रमाणे (C2 + 50 टक्के) म्हणजेच सर्वंकष उत्पादन खर्चावर आधारित दीडपट हमीभाव दिला तरच शेतकऱ्यांना शेती परवडू शकेल अशी परिस्थिती आहे.

केंद्र सरकारने मात्र सर्वंकष उत्पादन खर्च गृहीत न धरता केवळ (A2 + FL) म्हणजेच निविष्ठा व कुटुंबाची मजुरी एवढाच उत्पादन खर्च विचारात घेतला आहे. तो सुद्धा वास्तव खर्चापेक्षा खूप कमी धरण्यात आलेला आहे. इतर राज्यांच्या तुलनेत वेगवेगळ्या कारणांमुळे महाराष्ट्रात सर्वच शेतीमालाच्या उत्पादनाचा खर्च जास्त आहे. हा वाढीव उत्पादन खर्च सुद्धा विचारात देण्यात आलेला नाही असेह नवले यांनी नमूद केले.

msp hike an eyewash central government claim misleading says dr ajit navale of kisan sabha
Old Pune Mumbai Highway Traffic: वडगावमधील मातोश्री चौकात ग्रामस्थांचा रास्ता राेकाे, जाणून घ्या जुना मुंबई- पुणे महामार्गावरील वाहतुकीची स्थिती

एमएसपीमध्ये भरीव वाढ करून शेतीमालाला रास्त भाव मिळेल यासाठी सरकारी खरेदी यंत्रणा सक्षम करावी, तसेच येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात उद्योगपतींची कर्जमाफी नव्हे, तर शेतकरी-शेतमजुरांच्या कर्जमुक्तीची घोषणा करून ती अमलात आणावी अशी आग्रही मागणी किसान सभा करत आहे असेही डॉ. अजित नवलेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

msp hike an eyewash central government claim misleading says dr ajit navale of kisan sabha
Wardha: शेतकरी महिला निधी बँकेच्या ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा, अधिवेशनात आवाज उठवणार: आमदार पंकज भाेयर

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com