देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १७ व्या हत्याची तारीख जाहीर केली आहे. आज म्हणजेच १८ जून रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २००० रुपये जमा केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याचे वाटप केले जाईल. देशातील साधारण ९.२६ कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.
पीएम किसान योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी २ हजार रुपयांची मदत केली जाते. वर्षातून तीनवेळा म्हणजेच ६००० इतकी मदत शेतकऱ्यांना मिळते. आतापर्यंत या योजनेचे १६ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. यापूर्वी २८ फेब्रुवारी रोजी १६ वा हप्ता जारी करण्यात आला होता.
यामध्ये २१ हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणाऱ्या १७ व्या हफ्त्याची वाट पाहात होते. मात्र आता शेतकऱ्यांची ही प्रतीक्षा संपली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर पदभार स्वीकारताच त्यांनी किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर सही केली होती. त्यामुळे १७ व्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला होता. आज ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे.
सध्या देशातील अनेक भागात मान्सूनचे आगमन झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणीची लगबग सुरू आहे. खते, औषध फवारणी यासाठी शेतकरी पैशांची जमावाजमव करीत आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांच्या बँख खात्यात आता २००० रुपये येणार आहेत. त्यामुळे या पैशांची शेतकऱ्यांना फार मदत होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.