Pandharpur News: बनावट औषधांची निर्मिती, कृषी विभागावर ठपका; पंढरपुरात जनहित शेतकरी संघटना आक्रमक

pandharpur janhit shetkari sanghatana demands inquiry of krushi seva kendra: संबंधित कंपनीच्या बुरशीनाशक औषधांची पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणी केली असता ते बुरशीनाशक रासायनिक औषध हे अप्रमाणित असल्याचे आढळून आले होते.
pandharpur janhit shetkari sanghatana demands inquiry of krushi seva kendra
pandharpur janhit shetkari sanghatana demands inquiry of krushi seva kendraSaam Tv

पंढरपूर तालुक्यात शेती पिकांसाठी वापरल्या जाणाऱ्या कीटक आणि बुरशी नाशक बनावट औषधांची विक्री केली जात असल्याची तक्रार जनहित शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे. सरकारने शेतक-यांच्या बाजूने याेग्य ताे निर्णय घ्यावा अन्यथा जनहित शेतकरी संघटना राज्यभर आंदाेलन छेडेल असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.

अलीकडेच पंढरपूर तालुक्यातील अनवली,कासेगाव या भागातील शेतकर्यांनी आपल्या द्राक्ष बागांवर एका कंपनीचे बुरशी नाशक रासायनिक औषधांची फवारणी केली होती. फवारणी नंतर द्राक्ष वेलीचे पाने पिवळी पडून द्राक्ष घड गळून पडले होते. यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले होते.

pandharpur janhit shetkari sanghatana demands inquiry of krushi seva kendra
Dengue Outbreak In Hatkanangale: हातकणंगले तालुक्यात डेंग्यूचा कहर, मिरजसह इचलकरंजीत रुग्ण उपचारार्थ दाखल

त्यानंतर कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून राज्य शासनाला या संदर्भात अहवाल दिला होता.‌ यादरम्यान संबंधित कंपनीच्या बुरशीनाशक औषधांची पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणी केली असता ते बुरशीनाशक रासायनिक औषध हे अप्रमाणित असल्याचे आढळून आले होते.

परंतु अद्याप संबंधित औषध निर्माण करणाऱ्या कंपनीवर व विक्रेत्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही किंवा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली नाही. कृषी विभागाने बनावट औषधांची निर्मिती करून त्याची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अन्यथा राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा ही प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

pandharpur janhit shetkari sanghatana demands inquiry of krushi seva kendra
Tuljapur : 'त्या' प्रकरणात गुन्हे दाखल करा, तुळजापुरात हिंदू जनजागृती समितीचे घंटानाद आंदोलन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com