Tuljapur : 'त्या' प्रकरणात गुन्हे दाखल करा, तुळजापुरात हिंदू जनजागृती समितीचे घंटानाद आंदोलन

hindu janajagruti samiti ghantanaad andolan in tuljapur against tuljabhavani sansthan: अटक करा...अटक करा...भ्रष्टाचाऱ्यांना अटक करा अशी घोषणाबाजी करत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
hindu janajagruti samiti ghantanaad andolan in tuljapur against tuljabhavani sansthan
hindu janajagruti samiti ghantanaad andolan in tuljapur against tuljabhavani sansthanSaam Digital

- बालाजी सुरवसे

तुळजापुरात सिंहासन दानपेटी घोटाळ्या प्रकरणी हिंदू जनजागृती समिती आज (शनिवार) आक्रमक झाल्याचे पाहावयसा मिळाले. हिंदू जनजागृती समितीने तुळजाभवानी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर घंटानाद आंदोलन केले. यावेळी आंदाेलकांनी तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या भ्रष्टाचाराचे गुन्हे तात्काळ दाखल करावेत अशी मागणी केली.

तुळजापूर येथील हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते म्हणाले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात झालेल्या सिंहासन दानपेटी घोटाळ्या प्रकरणात संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. एक महिना उलटूला मात्र अद्यापही काेणतीच कार्यवाही झालेली नाही.

hindu janajagruti samiti ghantanaad andolan in tuljapur against tuljabhavani sansthan
टाळ मृदुंगाच्या गजराने संतनगरी दुमदुमली; संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी शेगावातून पंढरीकडे प्रस्थान

राजन बूनगे यांनी साम टीव्हीशी संवाद साधताना पाेलिसांनी लवकरात लवकर संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत. आजच्या आंदाेलनाची दखल न घेतल्यास न्यायालयात अवमान याचिका दाखल करु असा इशारा देखील हिंदू जनजागृती समितीच्या वतीने देण्यात आला. यावेळी - पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी देखील पाेलिसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत दाेषींवर तात्काळ गुन्हा नाेंदवावा अशी अपेक्षा व्यक्त केली.

Edited By : Siddharth Latkar

hindu janajagruti samiti ghantanaad andolan in tuljapur against tuljabhavani sansthan
पर्यटकांनाे! आंबोली घाटात धबधबा पाहण्यासाठी जाणार आहात? वाचा नवा नियम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com