Tuljapur: पुजारी मंडळाला हवे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे पद, जाणून घ्या मागण्या

जनसंपर्क अधिकारी पद नियुक्त करताना समाजिक भान, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड व तेलगु या भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीला करावे अशी मागणी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासेंना केली.
pujari mandal various demands in tuljabhavani mandir sansthan
pujari mandal various demands in tuljabhavani mandir sansthanSaam Digital
Published On

- बालाजी सुरवसे

पुजा-यांच्या हितासाठी आणि प्रशासकीय कामकाज सुलभ व्हावे यासाठी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने नुकतेच जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यामध्ये धार्मिक व्यवस्थापक हे पद तिन्ही पुजारी मंडळाच्या सहमतीने भरण्यात यावे अशी प्रमुख मागणी पुजारी मंडळाने केल्याची माहिती पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे यांनी दिली.

तुळजाभवानी मंदिरातील धार्मिक व्यवस्थापक पद पुजारी बांधवांसाठी राखीव ठेवण्यात यावे, तुळजाभवानी मंदिर संस्थांमधील कर्मचारी भरतीमध्ये पुजाऱ्यांना 50 टक्के जागा द्या, धार्मिक व्यवस्थापक हे पद तिन्ही पुजारी मंडळाच्या सहमतीने भरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.

pujari mandal various demands in tuljabhavani mandir sansthan
Dharashiv : 10 दिवसांपूर्वी झाला हाेता विवाह, पतीला पत्नीचा पाहावा लागला मृतदेह; नेमकं काय घडलं नळदुर्ग किल्ल्यात?

धार्मिक व्यवस्थापक पद हे पुजारी बांधवाला दिल्यास धार्मिक विधी, मंदिर प्रशासन, पुजारी वाद- विवाद माहिती असेल तर भविष्यात कोणतीही कायदेशीर बाब निर्माण होणार नाही. जनसंपर्क अधिकारी पद नियुक्त करताना समाजिक भान, मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, कन्नड व तेलगु या भाषा अवगत असणाऱ्या व्यक्तीची नियुक्ती करावी श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाने जिल्हाधिकारी तथा तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे मागणी पुजारी मंडळाने केल्याची माहिती पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

pujari mandal various demands in tuljabhavani mandir sansthan
Shivrajyabhishek Sohala 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्याला आचारसंहितेचा अडसर? सरकारने मार्ग काढावा : संभाजीराजे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com