टाळ मृदुंगाच्या गजराने संतनगरी दुमदुमली; संत गजानन महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी शेगावातून पंढरीकडे प्रस्थान

sant gajanan maharaj palkhi on the way to pandharpur for aashadhi wari 2024 : प्रतापराव जाधव यांनी यांनी आज संत गजानन महाराज यांच्या समाधीचे शेगावात दर्शन घेतले. त्यानंतर ते पालखी साेहळ्यात सहभागी झाले.
sant gajanan maharaj palkhi on the way to pandharpur for aashadhi wari 2024
sant gajanan maharaj palkhi on the way to pandharpur for aashadhi wari 2024Saam Digital

गण गण गणात बोते.. जय गजानन श्री गजानन.. विविध अभंगांच्या निनादात आज शेगाव येथील संत गजानन महाराज यांची पालखी संत नगरीतून पंढरपूरकडे रवाना झाली. श्रींची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत असताना भाविकांचा उत्साह द्विगुणीत झाला हाेता.

श्री गजानन महाराज संस्थानच्या पालखीचे ब्राम्हवृंदानच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रींच्या सेवधारी व्यवस्थापकीय विश्वस्थांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली.

संत गजानन महाराज संस्थेच्या यंदा दिंडीचे हे ५५ वे वर्षे आहे. जवळपास सातशे वारकऱ्यांसह राज वैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झाले. या दिंडीत ७०० वारकरी, २५० पताकाधारी २५० टाळकरी २०० सेवेकरी असा मोठा ताफा घेऊन श्रींची पालखी निघाली. पुढील एक महिना पायी प्रवास करून 15 जुलैला पालखी पंढरपूर येथे पोहोचेल. पंढरपूर येथील आषाढी उत्सवात सर्व वारकरी सहभागी होणार आहेत.

sant gajanan maharaj palkhi on the way to pandharpur for aashadhi wari 2024
Graduate Constituency Election News: उद्धव ठाकरेंनी काॅंग्रेसला गप्प केले, हिम्मत असेल तर..., नितेश राणेंचे नाना पटाेलेंना आव्हान

राज्यभरातील भाविक पायदळ वारीसाठी सज्ज

आषाढी एकादशी १७ जुलैला आहे. या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो. त्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात. आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या आषाढी वारीसाठी २९ जूनला प्रस्थान होणार आहे. पंढरपुरात चार दिवसांच्या मुक्कामानंतर आषाढीचा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी २१ जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल. यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाले आहेत.

Edited By : Siddharth Latkar

sant gajanan maharaj palkhi on the way to pandharpur for aashadhi wari 2024
Tuljapur: पुजारी मंडळाला हवे तुळजाभवानी मंदिर संस्थानचे पद, जाणून घ्या मागण्या

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com