Rail Roko Andolan: निडी ग्रामस्थांनी राेखली पॅसेंजर ट्रेन, आंदाेलकांसमाेर अधिकारी नरमले (पाहा व्हिडिओ)

nidi citizens andolan at rail track roha diva paasenger train near raigad : ग्रामस्थांनी रोहा दिवा पॅसेंजर अर्धा तास रोखून धरली. या मार्गावरील फाटक बंद करून रेल्वेने ग्रामस्थांना पर्यायी मार्ग म्हणून बोगदा करून दिला परंतु त्यातून वाहतुकीस अडचण हाेत असल्याचे ग्रामस्थांनी नमूद केले.
nidi citizens andolan at rail track roha diva paasenger train near raigad
nidi citizens andolan at rail track roha diva paasenger train near raigad Saam Digital
Published On

- सचिन कदम

रेल्वे फाटक बंद केल्याने हाेणारी गैरसाेय रेल्वे प्रशासनास लक्षात यावी यासाठी रायगड जिल्ह्यातील निडी ग्रामस्थांनी नुकतेच कोकण रेल्वे मार्गावर आंदाेलन छेडले. ग्रामस्थांनी सुमारे अर्धा तास कोकण रेल्वे मार्ग राेखून धरला. दरम्यान रेल्वे अधिका-यांनी आंदाेलनस्थळी भेट देत ग्रामस्थांना बाेगदा मधील काम पूर्ण हाेईपर्यंत फाटक सुरू ठेवणार असल्याचे आश्वासित केले.

कोकण रेल्वे मार्गावर रोहा तालुक्यातील निडी येथे बाेगदा बांधला आहे. या बोगद्यात पावसाचे पाणी साचते. यामुळे निडी ग्रामस्थानी सोमवारी संध्याकाळी कोकण रेल्वे मार्गावर ठिय्या आंदाेलन केले.

nidi citizens andolan at rail track roha diva paasenger train near raigad
Vidhan Sabha Election : अजित पवार गट नकाे! विधानसभा निवडणूक स्वबळावर लढू, भाजप कार्यकर्ते, पदाधिका-यांची मागणी

पावसाळ्यात या बोगद्यात पाणी साचत असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. त्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. अखेर रेल्वेचे अधिकारी आंदोलनाच्या ठिकाणी आले. जो पर्यंत बोगद्यातील अडचणी दूर होत नाहीत तो पर्यंत फाटक सुरू ठेवण्याचे अधिका-यांनी मान्य केले. त्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.

Edited By : Siddharth Latkar

nidi citizens andolan at rail track roha diva paasenger train near raigad
Amboli : अवैध गोवंश तस्करी प्रकरणी कर्नाटकातील चाैघे ताब्यात, 9 जनावरांची सुटका; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com