Amboli : अवैध गोवंश तस्करी प्रकरणी कर्नाटकातील चाैघे ताब्यात, 9 जनावरांची सुटका; 29 लाखांचा मुद्देमाल जप्त

amboli police arrests 4 from karnataka along with animals: पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांचा मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद पाटील, हवालदार दीपक शिंदे, पोलिस नाईक मनीष शिंदे, हवालदार अभी कांबळी, कॉन्स्टेबल आनंद बरागडे, पिरणकर यांनी ही धडक कारवाई केली आहे.
amboli police arrests 4 from karnataka along with animals
amboli police arrests 4 from karnataka along with animalsSaam Tv

- विनायक वंजारे

बेकायदेशिररित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या कर्नाटक येथील चाैघांना पाेलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडील मालवाहू ट्रक, एक कार आंबोली पोलीसांनी जप्त केली आहे. या धडक कारवाईत पाेलिसांनी एकूण 29 लाख 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यानंतर जखमी बैलासह उर्वरीत बैल गोवा राज्यातील करासवाड- शिकेरी येथील गो शाळेत सुखरूप पाठवण्यात आले.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार रविवारी सकाळी गुरांनी भरलेला मालवाहू ट्रक सावंतवाडी- आंबोली मार्गे कर्नाटक राज्यात निघाला होता. या मालवाहू ट्रक समवेत एक कार देखील हाेती. या मालवाहू ट्रकची आंबोली चेक पोस्टला तपासणी केली असता त्यामध्ये तब्बल 9 बैल आढळून आले‌. आंबोली पोलिसांनी अधिक चाैकशी केली असता चालकास समपर्क उत्तर देता आले नाही.

amboli police arrests 4 from karnataka along with animals
ठेकेदारांची शक्ती वाढवण्यासाठी महामार्गाचा घाट, शेतकरी आक्रमक; शक्तीपीठ महामार्ग विरोधात 18 जूनला कोल्हापुरात महामोर्चा (पाहा व्हिडिओ)

आंबोली पोलिसांनी गो तस्करी करणाऱ्या या दोन्ही गाड्यांसह कर्नाटक येथील चार युवकांना ताब्यात घेतले. महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम २०१५, प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम १९६०, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ११९ प्रमाणे, मोटार वाहन कायदा कलम-१८४ प्रमाणे या गुन्हयातील संशयित आरोपी सैफअली अयुबहुसैन मडीवाले (वय 30 राहणार जळगाव पिरणवाडी, जिंदतनगर, ता.जि. बेळगाव), अदनान रमजान बेपारी (वय 23, राहणार कसाई गल्ली, कॅम्प, ता.जि. बेळगाव), नविदअलीखान मोहम्मदअलीखान पठाण (वय 32) राहणार बेळगाव पिरणवाडी, ता.जि. बेळगाव), इसा बहूद्दीन बेपारी (वय 23) राहणार बेळगाव मार्केट इस्टेट, ता.जि. बेळगाव यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

amboli police arrests 4 from karnataka along with animals
रत्नागिरी : वेरवली धबधबानजीक दुर्देवी घटना, युवकाचा मृत्यू, कळसवली गावावर शाेककळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com