फक्त गोड पदार्थ खाल्ल्यानेच नाही तर 'या' कारणांनीही वाढतो मधुमेहाचा धोका; आताच सतर्क व्हा!

Diabetes Control: मधुमेहाच्या रुग्णांना गोड पदार्थ खाण्यास मनाई असते. परंतु गोड खाल्ल्यामुळे खरचं मधुमेहाचा धोका असतो का? चला जाणून घेऊया.
foods
Diabetes Canva
Published On

डायबिटीस म्हणजे मधूमेह या आजाराबद्दल समाजात बरेच गैरसमज आहेत. मधूमेहींना गोड पदार्थ वर्ज्य आहेत आणि म्हणूनच अनेकांना वाटते अति गोड खाल्याने मधूमेह होतो. परंतु तसे नाही. मुळात मधिमेहाचे अनेक प्रकार आहेत. आज मधूमेह कशामुळे होतो ते सांगणारे.

प्रकार 1 - टाईप वन डायबिटीस

हा आजार बहुतांशवेळा आनुवंशिकतेने होतो. जर एक किंवा दोघाही पालकांना टाईप 1 मधुमेह असेल तर त्यांच्या मुलांना तो होण्याची शक्यता जास्त असते.

त्याबरोबरच स्वयंप्रतिकार शक्ती महत्वाची भुमिका बजावते. शरीराची रोगप्रतिकारक यंत्रणा चुकून स्वादुपिंडातील पेशींवर हल्ला करते आणि इंसुलिन तयार करणारे हार्मोन नष्ट करते. हा तोच हार्मोन असतो जो रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करतो.

foods
Yoga For Diabetes : मधुमेह टाळण्यासाठी औषधांपेक्षा ही 4 योगासने ठरतील अधिक प्रभावी, महिन्यात दिसेल फरक

प्रकार 2 - टाईप टू डायबिटीस

प्रकार 1 प्रमाणेच, कौटुंबिक मधुमेहाचा इतिहास असल्यास आनुवंशिकतेने ठराविक वयात मधुमेह होतो. पण त्याबरोबरच काही ठराविक शारिरिक अवस्थांमुळे तो होतो.

वजन जास्त असल्यास किंवा लठ्ठपणा असल्यास ही आपल्यासाठी एक जोखीमच आहे. शरीरातील अतिरिक्त चरबीमुळे इन्सुलिनवर परिणाम होऊ शकतो.

तसंच, शारीरिक निष्क्रियता. बैठं काम, आरामदायी जीवनशैली इन्सुलिन प्रतिरोधकतेच्या विकासास हातभार लावू शकते.

वयाच्या ४५ नंतर डायबिटीसचा धोका वाढतो. काही प्रमाणात वांशिकतासुद्धा कारणीभूत ठरते.

गर्भावस्थेतील असताना मधुमेहाचा धोका आहे को, तर हो. 9 पौंडांपेक्षा जास्त बाळाचं वजन प्रसूतीवेळी असेल तरीही मधूनेहाचा धोका असतो.

पॉलीसिस्टिक ओवरीयन सिंड्रोम असल्यास तुम्ही स्वताची काळजी घ्यायला हवी.

तसंच, स्लीप एपनिया आणि काही औषधे आणि वैद्यकीय परिस्थिती सुद्धा कारणीभूत ठरू शकते.

गर्भावस्थेतील मधुमेह:

- गर्भधारणेदरम्यान हार्मोनल बदल

- लठ्ठपणा आणि शारीरिक निष्क्रियता

- मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास

- वय 35 किंवा त्याहून अधिक

- गरोदरपणातील मधुमेहाचा किंवा 9 पौंडांपेक्षा जास्त वयाच्या बाळाला जन्म देण्याचा पूर्वीचा इतिहास.

मधुमेहाचे इतर प्रकार:

- मोनोजेनिक मधुमेह (दुर्मिळ अनुवांशिक प्रकार)

- काही औषधांमुळे दुष्परिणाम म्हणून मधुमेह होऊ शकतो

- स्वादुपिंडाची शस्त्रक्रिया

- काही वैद्यकीय परिस्थिती

हा काही मधूमेह होण्याची सर्वसाधारण कारणे आहेत. परंतु, वर सांगितलेले आजार ज्यांना आहेत, त्या सर्वांना मधूमेह होइलच असे नाही.

डिस्क्लेमर - सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

foods
Diabetes Control Tips: सकाळी ही योगासने केल्याने मधुमेह राहील नियंत्रणात, रक्तातील साखर होईल कमी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com