Diabetes Tips : सावधान! मधुमेह असून उपवास करताय? 'या' गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर...

Fasting Tips For Diabetes : मधुमेहाच्या रुग्णांनी सहसा उपवास करणे टाळावे. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी हे फायदेशीर राहील. पण तरीही मधुमेह असलेल्या लोकांना उपवास करायचा असेल तर 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. नाहीतर आरोग्याला हानी पोहोचू शकते.
Fasting Tips For Diabetes
Diabetes Tips SAAM TV

सर्वत्र सणासुदीचा मौसम चालू आहे. त्यामुळे अनेक लोक उपवास करत आहे. खरतर उपसाव करणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. कारण त्यामुळे शरीरातील वाईट घटक बाहेर पडतात. तसेच आपल्या पचनप्रकियेला सुद्धा आराम मिळतो. पण उपवास कधीही आरोग्याची काळजी घेऊन करावा. आजारांमध्ये उपवास करू नये.

आजकाल अनेक लोक मधुमेहाच्या समस्येने ग्रस्त असतात. तरी उपवास करण्याचा त्यांचा अट्टाहास असतो. पण मधुमेहाची समस्या असलेल्या लोकांनी उपवास करताना आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. दिवसभर मधुमेहाच्या लोकांनी रिकामी पोटी राहणे आरोग्यास घातक टरते. त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांनी उपवास करताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्यावे.

टाइप १ मधुमेह

विशेषत टाइप १ मधुमेह असलेल्या लोकांनी कधीही उपवास करू नये. यामुळे आरोग्य जास्त प्रमाणात धोक्यात येऊ शकते.

रक्तातील साखरेची पातळी तपासणे

मधुमेहाच्या लोकांनी उपवास करताना उपवासाच्या दरम्यान रक्‍तातील ग्‍लुकोज पातळी तपासणे खूप गरजेची आहे. कारण तुम्हाला संपूर्ण दिवस काढायचा असतो.

व्यायाम

मधुमेह असलेल्या लोकांनी उपवासात चालण्याचे आणि स्ट्रेचिंग करण्याचे व्यायाम करू शकता. पण स्वतःवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी.

आहार

मधुमेह असलेल्या लोकांनी उपवासात ड्रायफ्रूट्स आणि फळांचा नैसर्गिक रस पिऊ शकता. यामुळे शरीराला अनेक प्रथिने मिळतील. फळांचा रस बनवताना त्यांत चिया सिड्स टाकल्यास टाइप २ मधुमेह नियंत्रणात राहतो. व्हिटॅमिन सी, अँटिऑक्सिडंट्स समृध्द अन्नपदार्थांचे सेवन उपवासात करावे. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.

शरीर हायड्रेट

मधुमेहाच्या लोकांनी कधीही निर्जल उपवास करू नये. त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. उपवासात २ ते ३ लिटर पाणी पिणे गरजेचे आहे. त्यामुळे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. उपवासात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही मीठ न घालता ताक , लिंबूपाणी,पुदिन्याचे पाणी, वेलचीचा चहा,नारळाचे पाणी इत्यादी पदार्थ पिऊ शकता.

Fasting Tips For Diabetes
Health Tips: पावसाळ्यात पोटाचे आजार कसे टाळायचे? तज्ञांकडून घ्या जाणून

डॉक्टरांचा सल्ला

उपवासाला खाल्ल्या जाणाऱ्या पदार्थामुळे रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्‍त होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेहाच्या लोकांनी आधीच आपल्या दिवसाचे खाण्यापिण्याचे वेळापत्रक डॉक्टरांकडून बनवून घ्यावे. त्यामुळे उपवासाच्या दिवशी तुम्हाला त्रास होणार नाही.

आरोग्याच्या इतर समस्या

मधुमेहाच्या लोकांनी उपवास करताना रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण कमी झाले तर त्यांना अचानक घाम येतो, अशक्तपणा , हृदयाचे ठोके वाढणे या समस्या उद्भवतात.

टीप : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

Fasting Tips For Diabetes
Pain Killer Side Effect : जास्तप्रमाणात गोळ्या-औषधं खाल्ल्याने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com