Diabetes Control Tips: सकाळी ही योगासने केल्याने मधुमेह राहील नियंत्रणात, रक्तातील साखर होईल कमी

Manasvi Choudhary

Health Tips: मधुमेह (Diabetes) हा एक गंभीर आजार आहे. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, पौष्टीक आहार न घेतल्याने मधुमेह होतो. लहानांपासून वृद्धापर्यंत सर्व वयोगटातील लोक सध्या या आजाराला बळी जात आहेत.मधुमेह हा आजार एकदा झाला की तो पू्र्णत: बरा होत नाही. यामुळे आरोग्याची (Health) काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे.

मधुमेह या आजारांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. ज्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. पौष्टिक आहार आणि नियमितपणे व्यायाम केल्याने मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. यामुळे ज्यांना मधुमेह आहे. त्यांनी आहाराकडे तसेच नियमित व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

मधुमेह असणाऱ्यांनी कोणता व्यायाम करणे फायदेशीर

१) कपालभाती प्राणायाम (kapalbhati pranayama)

कपालाभाती प्राणायाम केल्याने शरीरातील मज्जातंतू आणि मेंदूच्या नसाला ऊर्जा प्रदान करते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा आसान अतिशय महत्वाचा आहे.

२) सुप्त मत्स्येन्द्रासन (supta matsyendrasana)

हे आसन शरीराच्या अंतर्गत अवयवांचे मालिश होते. सुप्त मत्स्येन्द्रासन केल्याने पचनक्रिया देखील सुधारते.

३) धनुरासन (dhanurasana)

धनुरासन केल्याने मधुमेहाच्या रुग्णांना अधिक फायदा होतो. या आसनामुळे स्वादुपिंडाचे कार्य उत्तमप्रकारे होते. धनुरासन केल्याने ओटीपोटातील अवयव बळकट होतात तसेच पोटावरील तणाव कमी होतो.

४) पश्मिमोत्तानासन (paschimottanasana)

हे आसन केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच मनाला शांती मिळते.

५) हलासन (halasana)

हे आसन दीर्घकाळ बसून काम करणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर आहे. हे आसन घशातील, फुफ्फुसातील आणि इतर अवयवांच्या ग्रंथीला उत्तेजित करते, ज्यामुळे संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण सुरळीत होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.