Asthma Causes and Symptoms: दमा देखील बरा होऊ शकतो; वाचा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला आणि उपचार

Asthma Causes, Symptoms and Treatment in Marathi: दम्यावर नियंत्रण आणण्यासाठी आणि उपचार घेऊन बरे होण्यासाठी परेल येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. समीर गर्दे यांनी या विषयी काही सिंपल टिप्स सांगितल्या आहेत.
Asthma Information in Marathi - Symptoms, Causes and Treatment
Asthma Information in Marathi - Symptoms, Causes and TreatmentSaam TV

आपल्या आजुबाजूला असलेली प्रचंड धूळ, माती आणि प्रदूषण या सर्वांमुळे श्वसनाशी संबंधित आजारांचे प्रमाण वाढत आहेत. अनेक व्यक्तींचा आजार बळावत असून त्यांना दमा झाल्याचे निदान होत आहे.

Asthma Information in Marathi - Symptoms, Causes and Treatment
World Asthma Day : या 5 कारणांवरुन कळेल तुम्हाला आला आहे दम्याचा अटॅक...

गेल्या काही दिवसांत दमा झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच या सर्व परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी आणि उपचार घेऊन बरे होण्यासाठी परेल येथील ग्लेनईगल्स हॉस्पिटल्सचे संचालक डॉ. समीर गर्दे यांनी या विषयी काही सिंपल टिप्स सांगितल्या आहेत.

दमा होण्याची कारणे (Asthma Reasons)

  • तणाव

    व्यक्तीच्या आयुष्यात विविध कारणांनी प्रमाणाबाहेर तणाव असल्यास त्याच्या श्वासावर त्याचा परिणाम होतो आणि दमा उद्भवतो.

  • धुम्रपान

    धुम्रपान आरोग्यासाठी अपायकारक तर आहेच. त्यामुळे आपल्यासह आजुबाजूच्या अन्य व्यक्तींच्या जीवालाही धोका असतो. त्यामुळे दमा असलेल्या व्यक्तींनी धुम्रपान करणे टाळावे. धुम्रपान केल्याने दम्याचा आजार आणखी बळावतो.

  • पाळीव प्राण्यांचे केस

    अनेक व्यक्तींना कुत्रा,मांजर, ससा अशा विविध पाळीव प्राण्यांचा लळा असतो. या प्राण्यांसह व्यक्ती दिवसभर खेळतात. त्यामुळे काही वेळा आपल्या तोंडात त्याचे केस जातात. याने देखील आपल्याला दम्याचा आजार उद्भवतो.

दम्याची लक्षणे (Asthma Symptoms)

  • आपल्याला छातीत घरघर होणे

  • दम लागणे

  • छातीत घट्टपणा

  • आणि खोकला येणे

अशी दम्याची लक्षणे आहेत. दमा झालेल्या व्यक्तीला हवा तेवढा श्वास पटकन घेता येत नाही. जास्त चालल्यास किंवा धावल्यास त्या व्यक्तीला दम लागतो. त्यामुळे पंपाच्या सहाय्याने व्यक्ती श्वास घेतात.

उपाय काय कराल? (Asthma Treatment)

  • दम्याचा त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांची भेट घ्या.

  • तुमच्या गरजेनुसार डॉक्टर दम्यावर औषोधोपचार करतील.

  • दमा होऊनये यासाठी जास्त धुळीच्या ठिकाणी जाऊ नका.

  • तुम्हाला धुळीची ऍलर्जी असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. ही फक्त ऍलर्जी आहे की दमा आहे हे तुम्हाला ओळखता येईल.

  • विविध शिबिरांना भेट देऊन आधी दमा कशामुळे होतो आणि त्याची लक्षणे काय हे सविस्तर जाणून घ्या.

Asthma Information in Marathi - Symptoms, Causes and Treatment
Asthma In Diwali Air Pollution : दिवाळीत फटाक्यांमुळे होतं हवेचं प्रदुषण! अस्थमा रुग्णांनी कसा करावा स्वतःचा बचाव? वाचा या 5 सोप्या टीप्स

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com