दिवाळीच्या दिवशी मुंबईसह देशभरातील अनेक शहरांची हवेची गुणवत्ता बिघडते. फटाके, थंड हवामान ही त्याची कारणे आहेत. वायू प्रदूषण वाढल्याने दमा आणि इतर श्वसनाच्या रुग्णांच्या समस्या वाढू लागल्या आहेत. अशा रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो आणि कधी कधी दम्याचा झटका येतो. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
आरोग्य (Health) तज्ज्ञांच्या मते, दिवाळी आणि त्यानंतरच्या काळात वायू प्रदूषणामुळे अस्थमाच्या रुग्णांना या समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: मुंबईमध्ये, हिवाळ्यात प्रदूषणाची पातळी जास्त राहते, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम (Effect) होतो. अशा स्थितीत सर्वांनी प्रदूषण टाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, दमा रुग्णांनी दिवाळीत विशेष काळजी (Care) घ्यावी. डॉक्टरांकडून त्याच्या टिप्स जाणून घ्या.
हवा प्रदूषित होते तेव्हा त्यात विषारी घटक मिसळतात. हे विषारी घटक श्वासोच्छवासाच्या वेळी लोकांच्या शरीरात पोहोचतात. यामुळे फुफ्फुस आणि श्वसनसंस्थेचे मोठे नुकसान होते. प्रदूषित हवेचा दीर्घकाळ श्वास घेतल्याने क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी), दमा आणि फुफ्फुसाचा कर्करोग यांसह अनेक आजारांचा धोका वाढतो.
प्रदूषणामुळे श्वसनसंस्था आणि फुफ्फुसांसह हृदयालाही इजा होऊ शकते. प्रदूषणामुळे दमा आणि श्वसनाच्या इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक सर्वाधिक प्रभावित झाले आहेत. या लोकांनी प्रदूषण टाळावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी.
प्रदूषणामुळे दमा होऊ शकतो
वायू प्रदूषण, हवामानातील बदल आणि ऍलर्जीमुळे दम्याचा त्रास होऊ शकतो. शक्य असल्यास, दमा रुग्णांनी दिवाळीपूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. अतिप्रदूषणामुळे त्यांची प्रकृती गंभीर होऊ नये म्हणून अनेक वेळा डॉक्टर अस्थमाच्या रुग्णांची औषधे बदलतात. दिवाळीत प्रदूषण वाढल्यास दम्याच्या रुग्णांनी घरातच राहावे आणि बाहेर जाताना मास्क घालावा.
जास्त प्रदूषण असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे आणि वेळेवर औषधे घ्यावीत. शक्य असल्यास, घरामध्ये एअर प्युरिफायर लावावे. यामुळे दम्याचा झटका येण्याचा धोका कमी होऊ शकतो. कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास किंवा दम्याचा झटका आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.