Manasvi Choudhary
हिवाळा सुरू झाला की बाजारात शिंगाडे विकायला येतात. या फळाला मोठ्या प्रमाणात मागणी असते.
हिवाळ्यात शिंगाडा हे फळ खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी शिंगाडा फायदेशीर असल्याने त्याचे सेवन केले जाते.
शिंगाड्यामध्ये कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. यामुळे हाडं आणि दात मजबूत होतात.
गरोदरपणात शिंगाडा खाल्ल्याने आई आणि बाळाचे आरोग्य चांगले राहते.
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी शिंगाड्याचे सेवन करावे.