लहानांपासून मोठ्यांपर्यंत चॉकलेट तर सर्वांनाच आवडतं. मात्र अनेक व्यक्ती चॉकलेट खाणे टाळतात. चॉकलेट खाल्ल्याने दात खराब होतात, त्यातील हाय कॅलरी आणि शुगरमुळे फॅट्सही वाढतात. तसेच रक्तातील साखरेचं प्रमाण जास्तप्रमाणात वाढतं. त्यामुळे शुगर, बीपी सारख्या समस्या असलेल्या व्यक्ती चॉकलेट खात नाहीत.
मात्र तुम्हाला माहिती आहे का? चॉकलेट खाण्याचे फक्त तोटे नाही तर फायदे देखील आहेत. तुम्ही कोणतं चॉकलेट खाता त्यावर ते डिपेंड आहे. कॅडबरी सिल्क असे चॉकलेट खाल्ल्याने विविध आजार जडतात. मात्र डार्क चॉकलेट या सर्व आजारांवर मात करते. त्यामुळे डार्क चॉकलेट आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं.
नॅश्नल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थ नुसार, डार्क चॉकलेट खाल्ल्याने तुमच्या शरीराला अँटीऑकस्कीडेंट आणि लोह मिळतं. तसेच हार्ट अटॅक सारख्या समस्या देखील कमी होतात. त्यामुळे शुगर असलेल्या व्यक्तींनी आनंद साजरा करताना तोंड गोड करण्यासाठी डार्क चॉकलेटला प्रथम प्राधान्य द्यावं.
बॅड कोलेस्ट्रॉल कमी होते
डार्क चॉकलेटमध्ये ७० टक्के कोको असतं. शरीरातील अँटिऑक्सिडंट्स वाढवण्यासाठी कोको पावडर फायदेशीर ठरते. यामध्ये पॉलीफेनोल्स, फ्लॅवेनॉल्स आणि कैटॅचिन असे अँटिऑक्सिडंट्स असतात. डार्क चॉकलेटमधील पॉलीफेनोल्स एलडीएल बॅड कॉलेस्ट्रॉल वाढण्यावर नियंत्रण ठेवतात.
ब्लड प्रेशर
अनेक व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशरचा त्रास असतो. डार्क चॉकलेटमधील फ्लॅवेनॉल्स आणि कैटॅचिनमुळे रक्त प्रवाह व्यवस्थित सुरू राहतो. त्यामुळे उच्च आणि कमी रक्तदावाच्या समस्या उद्भवत नाहीत.
थकवा दूर होतो
डार्क चॉकलेटमध्ये असलेल्या विविध प्रोटीन युक्त गोष्टींमुळे आपल्यासा आलेला थकवा देखील कमी होतो. अनेक व्यक्ती काही कारणास्तव आजारी असतात तेव्हा त्यांना थकवा जाणवतो. त्यावेळी ओआरएस सारख्या पावडरच्या पाण्याचे सेवन केले जाते. त्यासह तुम्ही डार्क चॉकलेट देखील खाऊ शकता.
टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही याचे समर्थन करत नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.