Dark Eyebrows : दाट आणि काळेभोर आयब्रो हवेत? ट्राय करा 'या' सोप्या टिप्स, आकर्षक दिसाल

Dark Eyebrows at Home : मेकअपच्या मदतीने मुली आपले आयब्रो काळे आणि दाट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कितीही केले तरी हा मेकअप आहे. त्यामुळे आज या बातमीतून नॅचरल आयब्रोसाठी काही सिंपल टिप्स जाणून घेऊ.
Dark Eyebrows
Dark EyebrowsSaam TV
Published On

प्रत्येक मुलीला सुंदर आणि आकर्षक डोळे असावेत असं वाटतं. अनेकदा डोळे टपोरे आणि सुंदर असतात मात्र आयब्रो पातळ किंवा काळेभोर नसल्याने चेहऱ्याचा लूक बिघडतो. कितीही मेकअप केला तरी चेहरा तितकासा आकर्षक दिसत नाही. त्यामुळे मुली विविध सौंदर्यप्रसाधने वापरतात.

Dark Eyebrows
Beauty Products Hacks : एक्सपायर झालेल्या मेकअप किटला फेकू नका! या भन्नाट ट्रिक फॉलो करून करा Reuse

बाजारात सध्या आयब्रो करेक्टर आलं आहे. यामध्ये ३ आयब्रो शेप दिलेले असतात. तसेच त्यात ब्लॅक, ब्राऊन शेड देखील असतात. मेकअपच्या मदतीने मुली आपले आयब्रो काळे आणि दाट करण्याचा प्रयत्न करतात. मात्र कितीही केले तरी हा मेकअप आहे. त्यामुळे आज या बातमीतून नॅचरल आयब्रोसाठी काही सिंपल टिप्स जाणून घेऊ.

एरंडेल तेल

अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांसारखे असलेलं एरंडेल तेल बऱ्याच गोष्टींसाठी उपयुक्त आहे. आयब्रो पातळ असल्यास तुम्ही देखील हे तेल वापरू शकता. याने नवीन भुवया येतात आणि चेहरा सुंदर दिसतो.

खोबरेल तेल

भुवया वाढवायच्या म्हणजे त्यासाठी तेल आवश्यक आहे. मग तुम्ही खोबरेल तेल देखील येथे वापरू शकता. रात्री झोपण्याआधी एक चमचा कोमट खोबरेल तेल भुवयांवर अपल्याय करा. ८ दिवसांत तुम्हाला रिजल्ट मिळेल.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेले जिवनसत्व आयब्रो जाड करण्यास मदत करते. त्यामळे किमान ५ मिनीटे हातावर तेल घेऊन ते भुवयांवर अप्लाय करत मसाज करा. असे केल्याने भुवया आधीपेक्षा जास्त पटीने जाड होतील.

कांदा रस

केसांच्या वाढीसाठी कांदा फार उपयुक्त आहे. तसेच आयब्रो काळ्या रंगाचे करण्यासाठी कांद्याचा रस उपयुक्त आहे. कांद्याचा रस भुवयांवर किमान १५ दिवस लावून पाहा. याने तुमच्या भुवयांना काळा रंग येईल.

टीप : ही फक्त सामान्य माहिती आहे. आयब्रोच्या गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने वरिल उपाय करण्यास प्राधान्य द्या.

Dark Eyebrows
Beauty Hacks: स्वयंपाकघरातील या पदार्थांनी काढा चेहऱ्यावरील केस, महागड्या पार्लरला करा बाय बाय!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com