

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज मोठ्या घोषणा केल्या
महिला कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची प्रसूती रजा जाहीर केली
प्रसूती रजेनंतर महिलांना एक वर्षापर्यंत अर्धवेतनी रजा घेण्याची सवलत देण्यात आली
सरकारच्या या निर्णयामुळे नोकरी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळाला
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिलांसाठी सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले आहे. राज्याच्या नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आज विधान परिषदेत मोठ्या घोषणा केल्या. महिला कर्मचाऱ्यांसाठी लवकर या लवकर जा ही नवीन प्रणाली लागू करण्यात आल्याचे सुनेत्रा पवार यांनी जाहीर केले. त्याचसोबत प्रसुती रजेबाबत देखील त्यांनी मोठी घोषणा केली आहे. महिलांना १ वर्षांपर्यंत प्रसुती रजा मिळणार आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी १८० दिवसांची प्रसूती रजा मंजूर केली. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल एक वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय अर्धवेतनी रजा घेण्यासही परवानगी देण्यात आल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सांगितले. राज्यात चौथे महिला धोरण लागू करण्यात आले असून त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तसंच, शक्ती कायदा लवकरच संमत व्हावा यासाठी शासन आग्रही असल्याचे त्या म्हणाल्या.
ग्रामीण भागातील महिलांचे जीवन अधिक सुरक्षित आणि सन्मानजनक व्हावे यासाठी ‘आदिशक्ती अभियान’ राबविण्यात येत असून बालविवाह रोखणे, अत्याचारमुक्त गाव निर्माण करणे आणि मुलींचे शाळा सोडण्याचे प्रमाण कमी करणे हा त्यामागचा उद्देश असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांनी घोषणा केलेल्या लवकर या लकवर जा या निर्णयानुसार मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी ९.१५ ते ९.४५ या कालावधीदरम्यान कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी कामकाज करतील तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच सुमारे ३० मिनिटांची सवलत देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे गर्दीच्या वेळेत महिलांची होणारी गैरसोय कमी आणि त्यांना होणारा त्रास कमी होणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील नोकरी करणाऱ्या महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.